- सर्व मानव जाती एका माता पिताची संतान- डॉ. रफिक पारनेरकर
जमाअ़त ए इस्लामी हिंद परळी तर्फे ईद-मिलन कार्यक्रम संपन्न.
परळीत सद्भावना मंचची स्थापना
परळी (प्रतिनिधी) :
जमाते इस्लामी हिंद हे राष्ट्रीय पातळीवर सामाजिक व बंधुभाव निर्माण करण्यात प्रयत्न करणारी संघटना आहे. आज या संघटनेच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सद्भावना मंचची स्थापना करण्यात आली.
दरम्यान शहरातील विविध धर्मगुरू व सामाजिक कार्यकर्ते यांच्या दरम्यान सद्भावना मंच स्थापन करण्याबद्दल बैठक झाली. आणि त्याच्यात परळीत सद्भावना मंच स्थापन करण्यात यावे असे ठरले. सद्भाभावनामंचाच्या
अध्यक्षपदी सर्व संमतीने प्रा. एम. एल. देशमुख यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी मुफ्ती सय्यद अशफाक काश्मी व प्रा. नरवाडे सरांची नियुक्ती करण्यात आली.
सचिवपदी सय्यद अन्वर तर सल्लागार समितीमध्ये
ज्ञानोबा माऊली उखळीकर महाराज, आनंद तूपसमुद्रे, डॉ.अमित दुपते फादर, मौलाना तैमूर मिल्ली यांची निवड करण्यात आली.
या यानंतर सात वाजता ईद मिलन कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्वप्रथम कुरान पठण सय्यद तज्जमुल फरहानने केली त्यानंतर स्वागत समारोप झाला प्रस्ताविक भाषणात सय्यद इफ्तेकार अहमद यांनी सद्भावनामंचाचा उद्देश सर्वांसमोर मांडला त्यानंतर प्रा. एम. एल. देशमुख अध्यक्ष सद्भावना मंच यांनी आपले विचार मांडले.
यावेळेस बोलताना देशमुख सरांनी देशात सद्भावना चे महत्त्व व आजच्या युगात सद्भावनाची गरज यावर आपले विचार मांडले. व सर्व परळीकरांना या कार्यात साथ देण्याची विनंती केली. त्यानंतर उपाध्यक्ष नरवाडे सरांनी आपले मत मांडले. यावेळेस ते म्हणाले वेळोवेळी महापुरुषांनी संतांनी लोकांना माणूस बनवण्याचा काम केला आजही आपल्याला माणूस म्हणून जगण्याची गरज आहे. देशाचा मुखिया जर जातीपातीत भेदभाव करत असेल तर हे दुर्भाग्याची गोष्ट आहे. यानंतर अध्यक्षीय भाषण डॉ. रफिक पारनेरकर यांनी केला व संत तुकाराम महाराजांचे अभंग व कुराणचे संदर्भ देऊन माणुसकी सध्या भावना व आपसात प्रेम कसं वाढेल याबद्दल आपले मत मांडले. यावेळेस बोलताना डाॅ. पारनेरकर म्हणाले आम्ही सर्व मानव जाती एका माता पित्याची संतान आहे. आणि कुराण फक्त मुस्लिम साठी नाही तर सर्व मानव जाती करता आहे माणसा माणसात उच नीच नाही तर माणूस कर्माने श्रेष्ठ होतो , माणसा माणसाला एक दुसर्याचे रक्त चालते एक दुसऱ्याचे डोळे चालतात मग हे भेदभाव का? असा म्हणत पारनेरकर साहेबांनी आपले मत मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सय्यद एजाज नक्शबंदी यांनी केली यानंतर सर्वांनी शीरखुर्माचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शेख सलीम, फिरोज खान, मसूद, शेख असलम, शेख हाजी, शेख जाबेर, शेख मिनाज व सय्यद सबाहत आली यांनी परिश्रम घेतला.