20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

बजरंग बप्पांचा विजयी गुलाल कोणीही रोखु शकत नाही-सुदामतीताई गुट्टे

महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

परळी/ प्रतिनिधी महाविकास आघाडी चे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ परळी शहरात जेष्ठनेत्या सुदामतीताई गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन बजरंग बप्पांचा विजयी गुलाल कोणीही रोखु शकत नाही असे जेष्ठनेत्या सुदामतीताई गुट्टे यांनी यावेळी सांगितले.

सौ.गुट्टे पुढे बोलताना म्हणाल्या कि, बीड जिल्ह्यामध्ये बेरोजगारांना कुठलीही
रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन न देणा-या भाजपा सरकारला हद्द पार करण्यासाठी महाविकास आघाडी च्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन करत महाविकास आघाडीच्या काढलेल्या पत्रक मतदाराच्या हातात देत संवाद साधत प्रचार फेरी पुढे जात होती. फक्त विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत आणि जातीपातीचे राजकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न भाजप कडुन केला जात आहे. त्यामुळे विकास हवा तर पर्याय नवा असंच बीड जिल्ह्याच्या जनतेने ठरवले आहे. एकाच घरांमध्ये वीस वीस, पंचवीस पंचवीस वर्षे खासदारकी, आमदारकी असून सुद्धा बीड जिल्ह्यासाठी काही करता आल नाही. या उलट हा जिल्हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे म्हणून हेच लोक अभिमानाने ओरडून सांगतात परंतु या ऊसतोड कामगारासाठी शेतकऱ्यांसाठी एकही विधायक काम केले नाही.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बीडच्या जनतेने या सर्व नेत्यांना यांची जागा दाखवणे आवश्यक आहे. जोपर्यंत घराणेशाही संपत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्याचा विकास होणार नाही. त्यामुळे बजरंग बाप्पाच्या रूपाने बीड जिल्ह्याला नवीन एक चेहरा मिळाला आहे. त्यामुळे बजरंग बाप्पा सोनवणेला सहकार्य करून येणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये बदल घडवावा असं आवाहन हि यावेळी जेष्ठनेत्या सुदामतीताई गुट्टे यांनी व्यक्त केल आहे.
या प्रचार फेरीत महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या