5 C
New York
Tuesday, December 3, 2024

Buy now

सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश

सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश

सुषमा अंधारे आणि पायलट दोघंही सुखरुप

मुंबई : वृत्तसंस्था

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघंही सुखरुप आहेत. हेलिकॉप्टर का क्रॅश झालं त्याची माहिती समोर आलेली नाही. महाड या ठिकाणी ही घटना घडली आहे.

सुषमा अंधारेंनी काय म्हटलं ?
मला  प्रचासभेसाठी जायचं होतं. दोन ते तीन सभा करायच्या होत्या आणि मंडणगड तसंच रोहा या ठिकाणी जायचं होतं. त्याआधीच ही घटना घडली आहे. महाडची सभा करुन मुक्कामाला थांबले होते. हेलिपॅडजवळ आम्ही होतो. चॉपर येणार होतं. चॉपरने ते दोन ते तीन घिरट्या घातल्या आणि अचानक मोठा आवाज झाला. तसंच धुळीचे लोट उठले. सुरुवातीला नीट काही समजलं नाही. पण आजूबाजूचे सगळे लोक सांगत होते की पुढे जाऊ नका. मला कॅप्टनची चिंता होती की ते सुखरुप आहेत की नाही? मात्र कॅप्टन सुखरुप आहेत. मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघे प्रवास करणार होतो पण आम्ही सगळे सुखरुप आहोत. प्रवास सुरु करण्याआधीच ही घटना घडली. असं सुषमा अंधारेंनी सांगितलं आहे.
https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या