25.8 C
New York
Sunday, May 26, 2024

Buy now

spot_img

जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अंबाजोगाई शहरात दिव्यांग मतदार जनजागृती रॅली संपन्न

जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अंबाजोगाई शहरात दिव्यांग मतदार जनजागृती रॅली संपन्न

अंबाजोगाई(प्रतिनिधी):-

देशात सध्या लोकसभा निवडणुक जाहीर झाली असून काही ठिकाणी मतदान देखील पार पडले आहे. मात्र जिथे जिथे लोकसभेचे मतदान झाले आहे त्याठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी अत्यंत खालावली आहे . ही खालावलेली मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशानुसार अंबाजोगाई शहरात दिव्यांग रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि.01 मे रोजी जिल्हाधिकारी बीड व समाज कल्याण अधिकारी बीड यांच्या आदेशानुसार दिव्यांग मतदार जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात गटशिक्षण अधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथून करण्यात आली. अंबाजोगाई चे तहसीलदार विलास तरंगे यांनी या दिव्यांग रॅलीस हिरवा झेंडा दाखवला. दिव्याग मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने जन जागृती रॅली चे आयोजन केले होते .रॅली सकाळी गटशिक्षण अधिकारी कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे सावरकर चौक,बस स्थानक येथून तहसील कार्यालय अंबाजोगाई येथे येऊन रॅलीची सांगता करण्यात आली.याप्रसंगी
सचिन देशपांडे, नायब तहसीलदार , अंबाजोगाई,
शेख सर गटशिक्षण अधिकारी,
स्मिता बाहेती, नायब तहसीलदार ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकार, समन्वयक नेरकर,अप्पासाहेब चव्हाण – नोडल अधिकारी, दिव्यांग जनजागृती कक्ष आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम व नियोजनबद्ध रॅलीसाठी जिल्हा परिषद प्रशाला शिवाजी चौक चे मुख्याध्यापक जोगदंड सर, हेमंत शिनगारे , विजय रापतवार, सर्व शिक्षा अभियानचे शिंदे सर,रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी चे अध्यक्ष स्वप्नील परदेशी, ओमकेश दहिफळे, जगदीश जाजू, संतोष मोहिते, धनराज सोळंकी व त्यांचे सर्व सदस्य , त्याचबरोबर मानव विकास अपंग शाळेचे मुख्याध्यापक इंद्रकुमार लोढा, बोधावर्धिनी मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक टी.पी. चव्हाण , अहिल्यादेवी मूकबधिर मुलींच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मस्के सर,ज्ञानवर्धीनी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामराव घुगे ,कर्तव्य मतिमंद मुलींचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. चौधरी मॅडम,बाबासाहेब परांजपे अपंग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम,मानव विकास मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत टाकळकर , दिव्यांग शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तसेच संचालक जगधने सर, कदम सर यांनी सहकार्य केले.
दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीचा समारोप कार्यक्रमात
तहसीलदार विलास तरंगे बोलताना म्हणाले की, सार्वत्रिक लोकशाहीचा महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा करण्यासाठी व मतदान करून घेण्यासाठी मतदान जनजागृती करून शंभर टक्के मतदान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मतदार जनजागृती करण्यासाठी मानवी साखळी निर्माण करण्याच्या हेतूने आज जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे तहसीलदार तरंगे यांनी यावेळी नमूद केले.. अंबाजोगाई शहरातील सर्व दिव्यांग शाळातील कर्मचारी यांनी उत्साहात सहभाग नोंदवून दिव्यांगांना सुद्धा शंभर टक्के मतदान करून घेण्याची हमी त्यांनी याप्रसंगी दिली. शहरात मतदार जनजागृती होऊन लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही आवर्जून स्पष्ट केले. गटशिक्षणाधिकारी शेख साहेब यांनी सुद्धा मतदार जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मतदान म्हणजे लोकशाहीचा सण असतो यामध्ये सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे व मतदान करून लोकशाही मजबूत करावी आदेही आवाहन शिक्षणाधिकारी शेख यांनी केले. दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांनी मतदार जनजागृती रॅली साठी केलेले सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचे शेख यांनी नमूद केले. या मतदार जनजागृती रॅलीमध्ये रोटरीचे जगदीश जाजू, जिल्हा परिषद शिक्षक केंद्रे , मुख्याध्यापक आनंद टाकळकर आदींनी आपले मतदार जागृती बाबत विचार मांडले. उपस्थित सर्व जणांनी मतदार जनजागृती बाबत घोषणा देऊन उत्साह वाढवला .या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधव व्हील चेअरवर बसून सहभागी झाले होते.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या