वीज कर्मचान्यांच्या पगारवाढीसाठी १५७० कोटींच्या तरतुदीची ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
वाढीव पगार जुलै २४ च्या वेतनात देण्याचे व्यवस्थापनाचे संकेत, लवकरच करार होणार- सि. एम. डी. लोकेश चंद्र
मुंबई : वृत्तसंस्था
म.रा. वि.मंडळ सुत्रधार कंपनी व तीनही वीज कंपन्यांतील जवळपास एम लाख ४ हजार कर्मचारी कर्मचारी यांचा सन यांचा सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठीच्या पगारवाढीसाठी व्यवस्थापनासमवेत ९ तर मा. उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीससाहेब यांच्या उपस्थितीत दि. ०७/०३/२०२४ रोजी सह्याद्री अतिथी गृहात बैठक संपन्न झाली तेंव्हा वीज कामगारांच्या पगारवाढीसाठी १४३४ कोटींची तरतुद केल्याचे सांगितले होते. मात्र तेंव्हा चर्चा अपूर्ण राहीली…
यानंतर दि. ०७/०७/२०२४ रोजी पुन्हा पगारवाढीसंदर्भात आयोजीत अंतीम बैठकीमध्ये मा. उपमुख्यंत्री तथा उर्जामंत्री यांनी शासन, व्यवस्थापन आणि संघटनांची भुमिका ऐकुण घेत्यल्यानंतर वीज कामगार अभियंते, अधिकारी यांच्या पगारवाढीसाठी १५७० कोटींच्या तरतुदीची घोषणा केली. त्यामध्ये मुळ वेतनामध्ये १९ टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये २५ वाढ असे जाहिर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज तांत्रीक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी संघटनेचे मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे दिली आहे. थोडक्यात पगारवाढ करारामध्ये खालील बाबींचा समावेश असेल.
नवीन पगारवाढ ही जुलै २०२४ च्या वेतनात समाविष्ट करण्यात येईल.
लाईनवर काम करणाऱ्या वर्ग ४ च्या तांत्रीक कामगारांना मागील पगारवाढ करारावेळी अॅडॉक दिलेले ५०० रू. वर्ग ४ मधून पदोन्नतीने वर्ग ३ मध्ये गेल्यानंतर मिळत नव्हते. ते या पगारवाढीमध्ये दोनही वर्गातील लाईनस्टाफला मिळणार. आणि रू. ५००/- ऐवजी रू. १०००/- मिळणार.
कर्मचाऱ्यांच्या दि. ०१/०४/२०२३ च्या मुळ वेतनावर १९ टक्के वाढ मिळणार आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या मुळ वेतनावर चालू असलेला महागाई भत्ता मिळणार.
विद्यमान सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ मिळणार,
सर्व सहायकांच्या मानधनामध्ये रु.५०००/- ची वाढीची घोषणा. या सहायकांनाही एप्रिल २०२३ पासूनचा फरक देण्याबाबत संघटना मागणी करणार असून फरक देण्यासाठी आग्रही राहणार.
पगारवाढीच्या थकबाकीचे १५ महिण्यांचा फरक ३ समान हप्त्यांमध्ये देण्याचा व्यवस्थापनाचा मानस असून पहिल्या ५ महिण्यांचा फरक ऑगस्ट २०२४, दुसर हप्ता ऑक्टोबर २०२४ आणि तिसरा हप्ता एप्रिल २०२५ मध्ये मिळणार.
पगारवाढ जाहिर झाली मात्र करार दि. ११ किंवा १२ जुलै रोजी होण्याची शक्यता.
ॲनॉमलीच्या विषयाबाबत
पगारवाढ करारामध्ये तांत्रीक कामगारांची मागील अनेक वर्षापासूनच्या असलेल्या ॲनॉमली निकाली काढण्यासाठी करारामध्येच डेड लाईन निश्चित करण्यात येऊन नंतरच करार व्हावा अशी मागणी करणार. २००८ ते २०२३ या कालावधीतील पगारवाढ करारामध्ये निर्माण झालेल्या ॲनॉमली कागदावरच राहतात त्या सोडविण्यात याव्यात.
१९८२ पासून तांत्रीक कामगारांची स्वतंत्र वेतनश्रेणीची असलेली मागणी निकाली काढण्यात यावी.. यंत्रचालक व लाईनस्टाफ यांचे मंडळाच्या विभाजनापुर्वी असलेले पदोन्नतीचे पदे पुर्ववत बहाल करण्यात यावे. आणि महापारेषण कंपनी आणि महावितरण कंपनीतील यंत्रचालकांच्या वेतनात निर्माण झालेली आर्थिक तफावर दूर करण्यात यावी.
ऑक्टोबर २०२३ ते डिसेंबर २०२३ दरम्यानच्या लाईनस्टाफच्या आंदोलनाप्रसंगी व्यवस्थापनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तंत्रज्ञ ते प्रधान तंत्रज्ञ अशी पदोन्नतीचा मार्ग सुरू करावा.
वरील सर्व प्रश्नांसाठी मा. अप्पर मुख्य सचिव यांनी मान्य केल्याप्रमाणे अगोदर बैठकीचे आयोजन करावे आणि वरील सर्व ॲनॉमली दूर करण्यासाठी पगारवाढ करारामध्ये डेड लाईन निश्चित करून नंतरच करार करण्यात यावा अशी मागणी संघटना करणार आहे.
पगारवाढीच्या या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, अप्पर मुख्य सचिव, उर्जा मा. श्रीमती अभा शुक्ला, अध्यक्ष तथा एम. डी. महावितरण मा. श्री. लोकेश चंद्र अध्यक्ष तथा एम. डी. महानिर्मिती मा.श्री.डॉ.पी. अन्बलगन, अध्यक्ष तथा एम.डी. महापारेषण मा. श्री. डॉ. संजीवकुमार यांच्या सह वरिष्ठ अिधिकारी आणि संघटनेच्या वतीने अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे, सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, कार्यकारी अध्यक्ष आर.पी.थोरात. उपाध्यक्ष ताराचंद कोल्हेमामा. बी.डी. पाटील, एस.पी. शाहीर, विष्णू घोडके यांची उपस्थिती होती.
आपला