जेष्ठ उद्योगपती बुधाजी दादा पानसरे बहुआयामी व्यक्तिमत्व
नाशिक : वृत्तसंस्था
क्रांतिवीर .व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या मदतीसाठी नेहमीच धावणारे पडदयाच्या पाठीमागे असणारे व्यक्तीमत्व म्हणजे बुधाजी दादा पानसरे आदराने त्यांना दादा म्हणतात . स्व . तुकारामजी दिघोळे साहेब यांचे घनिष्ट सहकारी म्हणून प्रसिद्ध आहे . संस्थेला आर्थिक अडचण असेल तेव्हा बुधाजी दादाचा दरवाजा मदतीसाठी नेहमीच उघडा असायचा . संस्थेच्या विविध कॉलेजच्या परवानगी व बांधकामासाठी दादांनी भरघोस व सढळ हातांनी मदत केलेली आहे . त्यांचे योगदान निश्चीत भूषणावह आहे . समाजाची असलेली एकमेव संस्थेचा अधिकाधिक विकास व्हावा या शुद्ध हेतूने त्यांनी सहभाग नोंदवला . संस्थेकडून कधीही सन्मान व पदाची अपेक्षा केलेली नाही व संस्थेच्या कोणत्याही निवडणूकामध्ये सहभाग नोंदविला नाही . समाजातील अनेक धुरी तांनी दादांना संस्थेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला . त्यांचा प्रयत्न ,जिद्द, मेहनत, इच्छा शक्तीचा उपयोग संस्थेला होइल हे निश्चीत च आनंदाची गोष्ट आहे . दादांचा अनमोल गुण दातृत्व आहे त्याचा देखील संस्थेला फायदा होइल . दादांनी आतापर्यंत विविध वधूवर सुचक मेळावे भरविले, दिव्यांग व अपंगाना निधी, दिवाळी फराळ वाटप, विविध मंदिरांना देणगी, अन्नदान, आरोग्य शिबीरांना मदत, विविध समाजपयोगी उपक्रम व कार्यक्रमांना भरीव निधी उपलब्ध करून दिलेला आहे असा निष्कलंक, दानशुर व शुन्यातून व प्रतिकूल परिस्थितीत स्वकष्टाने विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीमत्वाची गरज आहे . संस्थेला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचा त्यांचा महत प्रयास व महत्वाकांक्षा आहे . अतिशय दुरदृष्टी असलेला, संस्थेसाठी नेहमीच धडपड करणारा असल्यामुळेच लोक आग्रहास्तव संस्थेत श्री पंढरीनाथ थोरे व श्री शिवाजीराव मानकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील क्रांतीविर विकास पॅनल च्या विश्वस्त पदावर उभे असलेले बुधाजी दादा पानसरे या माध्यमातून समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने उभे आहेत . समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही . संस्थेचा व समाजाचा हितचिंतक म्हणून एक संधी त्यांना द्यावी ही माफक अपेक्षा करतो व विनंती करतो त्यांची निशाणी कप बशी असुन अनुक्रमांक १२ आहे तरी त्यांना सर्व समाज बांधवांनी प्रचंड बहुमतानी विजयी करावे असे आवाहन बाळासाहेब घुगे यांनी केले आहे