5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांची परळीत पत्रकार परिषद

बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांची परळीत पत्रकार परिषद

पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे : सय्यद हनिफ उर्फ बहादुरभाई

परळी : प्रतिनिधी

आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर व परळी तालुका व शहराच्या विविध विषयावर बीड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांची आज मंगळवारी दुपारी ठीक एक वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती परळी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर बाई यांनी दिली आहे.

परळी मतदारसंघातील विविध प्रश्नावर व परळी परभणी रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी वास्तव्यात असणाऱ्या नागरिकासंबंधी, तसेच होऊ घातलेल्या विधानसभे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बीड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, राजेसाहेब देशमुख या पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या पत्रकार परिषदेचे निमंत्रण परळीतील सर्व पत्रकार बांधवांना देण्यात आले आहे.

पत्रकार परिषद मंगळवार दि. 23 जुलै दुपारी 1.00 वाजता इमदादुल उलुम माध्यमिक शाळा पावर हाउसच्या पाठिमागे होणार आहे. तरी या महत्वपूर्ण पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे परळी शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष तथा निमंत्रण सय्यद हनिफ उर्फ बहादुरभाई यांनी सांगितले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या