5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

संत सावतामाळी मंदिरात २८ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

संत सावतामाळी मंदिरात २८ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

🔺संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त,रक्तदान शिबिर,गुणवंतांचा सत्कार

परळी (प्रतिनिधी)

संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त परळी येथील संत सावता महाराज मंदिरात रविवार दि.28 जुलै ते रविवार दि.4 ऑगस्ट या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन यानिमीत्त संत सावता महाराज चरित्र,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त परळी येथील संत सावता महाराज मंदिरात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते यावर्षी पहाटे ४ ते ६ काकडा भजन,७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण,१९ ते १ गाथा भजन,२ ते ४ श्री संत सावता महाराज चरित्र,५ ते ६ धुपारती,रात्री ७ ते ९ हरिकीर्तन, १० ते १२ जागर असे कार्यक्रम होणार आहेत.या सप्ताहात रविवार दि.२८ जुलै रोजी ह.भ.प. क्षीरसागर महाराज उखळीकर,दि.२९ जुलै रोजी ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले,दि.३० जुलै रोजी ह.भ.प.विठ्ठल महाराज,दि.३१ जुलै रोजी ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख,दि.०१ ऑगस्ट रोजी ह.भ.प.रामकृष्ण महाराज रंधवे,दि.०२ ऑगस्ट रोजी ह.भ.प.अर्जुन महाराज लाड,दि.०३ ऑगस्ट रोजी ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे हरिकीर्तन होणार आहे.शुक्रवार दि.2 ऑगस्ट रोजी संत नामदेव महाराज यांच्या समाधी महोत्सवानिमीत्त वासुदेव बाबा यांचे किर्तन तर सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त शनिवार दि.3 ऑगस्ट रोजी विठ्ठल महाराज उखळीकर यांचे किर्तन होणार आहे.

🔺 नगर प्रदक्षिणा,गुणवंतांचा सत्कार व रक्तदान शिबीर
अखंड हरिनाम सप्ताहात गुरुवार दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा.रक्तदान शिबीर व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन दि.३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वा. संत सावतामाळी मंदिर येथुन सावता महाराज पालखी सोहळा निघणार आहे. मंगल कलश, ध्वज पताका, टाळ,विणा,मृंदग,बॅन्ड लेझीमच्या निनादात दिंडी सोहळा निघणार आहे

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या