5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

राष्ट्रीय संत भगवान बाबा चौकात बाबांचा भव्य पुतळा लवकरच उभाणार – राजाभाऊ फड

🔺राष्ट्रीय संत भगवान बाबा चौकात बाबांचा भव्य पुतळा लवकरच उभाणार – राजाभाऊ फड

🔺राजाभाऊ फड यांनी भगवान बाबा चौकात नामफलकाचे केले पुजन

परळी : प्रतिनिधी

राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या 128 व्या जयंती निमित्ताने युवानेते राजाभाऊ फड यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात व परळी येथील संत भगवान बाबा चौकात नामफलकाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

राष्ट्रीय संत भगवान बाबा चौकात बाबांचा लवकरच भव्य पुतळा हुभा करणार असल्याचे युवानेते राजाभाऊ फड यांनी सांगितले.
दरम्यान श्री. फड पुढे बोलताना म्हणाले कि, परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिरेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर राष्ट्रीय
संत भगवान बाबा यांच्या नावाने चौक गेली कित्येक वर्षांपासून अस्तित्वात असताना शहरात अनेक महामानवाच्या नावाने असलेले चौक सुशोभित करण्यात आले आहेत ही बाब अभिनंदनीय तर आहेच पण राष्ट्रीयसंत भगवान बाबा यांच्या नावाने असलेल्या चौकाकडे दुर्लक्ष का केले जाते असा हि प्रश्न विचारावा वाटतो असे राजेभाऊ फड म्हणाले, परंतु आता यापुढे कोणाचीही वाट न पाहता, लवकरच राष्ट्रीयसंत भगवान बाबा यांचा भव्य पुतळा स्वखर्चाने उभा करणार असल्याचे युवानेते राजाभाऊ फड यांनी राष्ट्रीयसंत भगवान बाबा यांच्या 128 व्या जयंती दिनी जाहीर केले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या