आज मी नोकरीत पर्मनंट झालो, पण आई आणि बायकोची साथ नसल्यामुळे…. मोबाईल वर टेटस ठेऊन संपविले जीवन
अतुल्य महाराष्ट्र प्रतिनिधी – जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पाटोदा येथील पंचायत समितीमध्ये समावेशित शिक्षण विभागाचे साधनव्यक्ती म्हणून कार्यरत असलेले गजेंद्र गुंडाले-रेड्डी हे दोन दिवसापासून बेपत्ता होते. गुंडाले यांची दुचाकी गाडी ही पाटोदा तालुक्यातील सौताडा धबधब्याजवळ आढळून आली. गुरुवारी दिवसभर कर्मचारी आणि त्यांच्या मित्रांनी सौताडा परिसरातील धबधब्याजवळ आणि खाली उतरून सर्वत्र शोधाशोध केली. परंतु गुंडाले हे आढळून आलेले नव्हते. काल (दि.२३) रोजी सकाळी श्रीराम मंदिराच्या समोर डोहामध्ये सदरील कर्मचाऱ्यांचा मृतदेह सापडला असून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान गुंडाले यांनी दोन दिवसांपूर्वी मोबाईलवर संदेश पाठवला होता की, मी आज पर्मनंट झालो आहे. परंतू मला माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य आई, बायको यांची साथ नाही. म्हणत संपविले जीवन या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री यांनी समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचारी विशेष शिक्षक यांना कायम करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबई यांनी काम सुरु केले. ईकडे यालोकांकडुन पैसे उकळण्यासाठी यांच्या संघटना पुढे सरसावल्या ४ वर्षा पुर्वी कायम करतो म्हणून संघटनेच्या काही लोकांनी हस्ताकांमार्फत प्रत्येकी ९० हजार रुपये गोळा केले. ३ हजार १०० लोकांचे प्रत्येकी 90 हजार या प्रमाणे घेतले. त्यानंतर नुकतेच शासनाने घोषणा केली. आणि यामध्ये गजेंद्र पर्मनंट झाला. याची माहिती कुटुंबीयांना देतांना आई व बायको कसलीच साथ देत नाही. हे बाब गजेंद्र ला सहन न झाल्याने त्याने आपल्या मोबाईलवर वर “आज मी नोकरीत पर्मनंट झालो, पण आई, बायकोची साथ नसल्यामुळे, माझे जीवन संपवित आहे असा” मोबाईल वर टेटस ठेऊन थेट सौताडा गाठला व जीवन यात्रा संपवली..! गजेंद्र च्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पाटोदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी उबाळे हे पोलीस निरीक्षक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.