सत्यशोधक दादा केळुसकर गुरुजी यांच्या जयंती निमित्त पत्रकार भवन येथे २५ ऑगस्ट रोजी प्रबोधनसत्र
परळी /प्रतिनिधी
सत्यशोधक दादा कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या १६४ व्या जयंती निमित्त परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवनात २५ ऑगस्ट रोजी प्रबोधन सत्राचे आयोजन केले असून मुख्य वक्ते म्हणून फुले- आंबेडकरी अभ्यासक उद्बोधक चेतन निसर्गंध हे असणार आहेत..
सविस्तर माहिती अशी कि रविवार दि २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. सत्यशोधक दादा केळुसकर गुरुजी: एक आदर्श शिक्षक या विषयावर होत असलेल्या प्रबोधन सत्राची अध्यक्षता पत्रकार प्रा प्रवीण फुटके हे भूषविणार आहेत, चर्चासत्राचे उद्घाटक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपकार्यकारी अभियंता श्रीकांत इंगळे ,सपोनि प्रवीण जाधव, कल्याण अधिकारी शरद राठोड, ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार रानबा गायकवाड, विचारवंत ए तु कराड , लक्ष्मण वैराळ, विनोद उंबरे, नवनाथ दाणे,आदीची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहान स्टुडन्ट फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी व फुले – आंबेडकरी अभ्यास समूहचे भगवान साकसमुद्रे आणि परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने नितीन ढाकणे, जगदीश शिंदे, अभिमान मस्के, आकाश देवरे, महेश मुंडे, सम्राट गित्ते आदींनी केले आहे.