बीड कुंटणखान्यावर छापा, बाहेर जिल्हयातील 06 महिलांची सुटका अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष व बीड ग्रामीण पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी वर्षा व्हगाडे यांना गुप्त बातमीदामार्फत मिळालेल्या माहिती वरून सदरची कारवाई करण्यात आली
बीड : बातमीपत्र
दिनांक ३०/०८/२०२४ रोजी बीड शहरातील कल्याणनगर, चऱ्हाटा फाटा या भागात सुरज नवनाथ भोसले रा. तळेगाव ता.जि. बीड हा बाहेर जिल्हयातुन महिला बोलावुन त्यांच्याकडुन वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी वर्षा व्हगाडे यांना गुप्त बातमीदामार्फत मिळाली होती. त्यावरुन मा. पोलीस अधिक्षक, बीड यांनी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षास व बीड ग्रामीण पोलीस ठाणे यांना संयुक्त कारवाईचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने शुक्रवारी संध्याकाळी कल्याणनगर भागात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष व बीड ग्रामीण पोलीस यांचे वतीने सापळा लावण्यात आला. त्याप्रमाणे एका पंटरला डमी ग्राहक म्हणुन पाठवुन व वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणाची माहिती देऊन व सदर ठिकाणी रवाना करण्यात आले. डमी तेथे पोहोचल्यानंतर तेथे हजर असलेल्या मॅनेजर मारोती ऊर्फ विशाल रघुनाथ मिटकर याने डमी ग्राहकाकडुन १००० घेऊन वेश्यागमनासाठी महिला देण्याचे होकार देताच पंटरने पोलीसांना ठरल्याप्रमाणे ईशारा म्हणुन मिस्ड कॉल दिला त्यावेळी परिसरात दबा धरुन बसलेल्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे अधिकारी वर्षा व्हगाडे व त्यांचा स्टाफ तसेच बीड ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळुन कल्याणनगर येथील पत्र्याचे घरात चालत असलेल्या कुटुंणखान्यावर छापा मारला त्यावेळी तेथे बाहेर जिल्हयातील ०६ पीडीत महिला व मॅनेजर मारोती ऊर्फ विशाल रघुनाथ मिटकर मिळुन आला आहे. पीडीत महिलांकडे महिला अधिकारी यांनी विचारपुस केली असता, आरोपी सुरज नवनाथ भोसले व मॅनेजर मारोती ऊर्फ विशाल रघुनाथ मिटकर यांनी स्वताचे अर्थिक फायदयासाठी आम्हांला पैशाचे अमिष देऊन वेश्या व्यवसाय करण्यासाठी बोलावुन घेतले आहे. असे पीडीत महिलांनी सांगितले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांचे फिर्यादीवरुन (१) सुरज नवनाथ भोसले रा. तळेगाव ता. जि. बीड व (२) मॅनेजर मारोती ऊर्फ विशाल रघुनाथ मिटकर रा. तळेगाव ता. जि. बीड यांचेविरुध्द बीड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५,६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ, मा. अपर पोलीस अधिक्षक, बीड श्री. सचिन पांडकर, मा. पविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वांबर गोल्डे यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे, बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड यांनी केली या कारवाईमध्ये AHTU पथकाचे पोउपनि परमेश्वर सानप, सहायक फौजदार प्रताप वाळके, पोशि सतीश बहिरवाळ, दिपाली सावंत, पोपटराव गोंडे, अनिता खरमाटे, सविता सोनवणे तसेच बीड ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोह राऊत, गायकवाड या महिला व पुरुष पोलीस अंमलदारांचा सहभाग होता.