20.9 C
New York
Tuesday, October 8, 2024

Buy now

परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या घोंगडी बैठकीस लाखोच्या संख्येने उपस्थित रहा- अमित घाडगे पाटील

🔶आज परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या घोंगडी बैठकीस लाखोच्या संख्येने उपस्थित रहा- अमित घाडगे पाटील

परळी (प्रतिनिधी):

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात सभा, रॅली, काढलेल्या आपण पाहिलेले आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात घोंगडी बैठकांचे आयोजन केलेले आहे. याच अनुषंगाने मराठा आरक्षण जागर घोंगडी बैठक परळी मतदार संघात होणार आहे. आज दि.8 सप्टेंबर रोजी सकाळी 11वा. परळी शहरातील हालगे गार्डन येथे होणार आहे. बैठकीला लाखो समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मराठा सेवक अमित घाडगे पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकार केले आहे.

परळी वैद्यनाथाच्या पायथ्याशी असलेल्या हालगे गार्डन परळी विधानसभा मतदार संघाची भव्य दिव्य अशी घोंगडी बैठक मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत. सरकारने लगेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये लोकसभेप्रमाणे उमेदवार पाडणार की उभे करणार यावरही आपली भूमिका यामधून स्पष्ट करणार आहेत. तरी या बैठकीस परळी विधानसभा मतदार संघातील मराठा बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मराठा सेवक अमित घाडगे पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या