धामणगाव मध्ये दरोड्याच्या तयारीत असणारी चोरांची टोळी ग्रामस्थानी पकडली
पोलिसांना जे जमलं नाही ते ग्रामस्थांनी करून दाखवलं
आष्टी, अतुल्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क
दोन महिन्यापूर्वी आष्टी तालुक्यातील किन्ही व केरूळ येथील दरोड्याचा तपास लागलेला नसताना तालुक्यातील धामणगाव शिवारात रविवार रात्री साडेदहा ते अकरा वाजन्याच्या दरम्यान दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला धामणगाव येथील चौधरी व लोखंडे वस्तीवरील नागरिकांनी पकडले.या टोळीतील आठ जणांपैकी चौघांना दुचाकीसह पकडले तर इतर चौघेजण मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.या दरोडेखोरांकडून विना क्रमांकाच्या चार दुचाकी, किमती मोबाईल, लोखंडी गज, कत्ती, धारदार शस्त्र असा एकूण चार लाख सत्तर हजाराचा ऐवज मिळून आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,आष्टी तालुक्यातील धामणगाव शिवारात रविवार दि.८ रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास संशयीत आठजणांची टोळी एका हाॅटेल परिसरात असल्याचा संशय गस्तीवरील युवकांना आला.त्यावेळी नागरिकांनी एकमेकांना मोबाईल वरून संपर्क करुन जागे केले.व चोरांना झडप घालून युवकांनी पकडले.विशाल अनिल कंधारे (वय- २४) रा. वारजे दांगट ईस्ट राजनंदनी कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर-१०७ ता. हवेली जि. पुणे, अमर बाबासाहेब हजारे (वय-३०) रा. वाघाळा ता. अंबाजोगाई जि. बीड, हल्ली मुक्काम साई समृद्धी आपारमेंट शिवणे देशमुखवाडी ता. हवेली जि. पुणे, अमित अण्णागोंडा पाटील (वय -३०) रा. रामनगर शिवाजी चौक वारजे, माळवाडी ता. हवेली जि. पुणे, तुषार आनंद भरोसे, रा. वारजे माळेवाडी पुणे,अशी त्यांची नावे आहेत.मात्र या टोळीचे इतर चौघा साथीदारांनी अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केला.या दरोडेखोरांकडून विना क्रमांकाच्या चार दुचाकी, लोखंडी गज, कत्ती, एक धारदार शस्त्र, दोन लाख रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा जवळपास चार लाख सत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज मिळून आला आहे. वरील चार आरोपींना ग्रामस्थांनी पकडून अंभोरा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.याप्रकरणी अंभोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला.याबाबत तपास अधिकारी एपीआय मंगेश साळवे यांना माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क न झाल्याने आधिक माहिती कळू शकली नाही.
अंभोरा पोलिसांची आयजीच्या… जिवावर बायजी…!
याबाबत सत्य जाणून घेतले असता,येथील गावक-यांनी दिलेल्या माहितीनुसार ,रविवारी रात्री धामणगाव येथील पाथर्डी रोडवरील वस्तीवर दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास अनोळखी माणूस मोटरसायकलवर आला असता तो त्या मोटरसायकलची नंबर प्लेट काढत होता.नंबर प्लेट काढत असताना वस्तीवरील शेतकऱ्यांने त्याला पाहिले व त्याकडे जात असताना तो पळून गेला.पळून गेल्यानंतर तेथील वस्तीवरील नागरिकांनी त्याचा पाठलाग करून तो धामणगाव येथील एका हॉटेलवर जेवणासाठी गेल्याचे दिसले.त्यानंतर सर्व गावकरी एकत्र येऊन संबंधित हॉटेलवाल्याला फोन करत येथे कोणी आले का? असे विचारले असता त्याने येथे जेवण्यासाठी आता आठ जण आले आहेत असे सांगितले.त्यानंतर सर्व गावकरी त्यांच्याकडे गेले व त्यांची चौकशी सुरू केली तर त्यांना संशय आल्याने तेथील चार तरूण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यास यशस्वी ठरले तर चार जणांना पकडले.ही घटना घडल्याची माहिती गावकऱ्यांनी अंभोरा पोलिसांना दिली.त्यानंतर हे अंभोरा पोलिस किमान तीन तासानंतर इथे पोलीस आले.त्यानंतर त्यातील दुचाकी गाडी ही पाथर्डी तालुक्यात असल्याने त्यांनी पाथर्डी पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. थांबोरा पोलीस स्टेशनच्या या जावई शोधामुळे गावकरी आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्या चार चोरट्यांना पोलिस ठाण्यात नेले.व दरोडेच्या तयारीत आलेले दरडखोर अंभोरा पोलिसांनी पकडले असल्याची माहिती दिली.म्हणजे
अंभोरा पोलिसांची आयजीच्या…,जिवावर बायजी…! असे म्हणावे लागेल.