आष्टीत पीएम कुसुम सौर ऊर्जा पंप योजनेमध्ये सब एजंटांनी केला कोट्यावधी रुपयांचा घोटाळा..?
बंदुकीचा धाक दाखवून मंजूर पंप रोख स्वरूपात दुसर्याला विकले ?
माजी राज्यमंत्री सुरेश धस यांची चौकशीची मागणी, आष्टी पोलिसात तक्रार दाखल..
आष्टी – कुसुम सौर योजना हा भारत सरकारचा उपक्रम असून शेतकऱ्यांमध्ये सौर ऊर्जा निर्मितीला चालना देऊन त्यांच्या जमिनीवर सौर पंप आणि सौर ऊर्जा संयंत्र बसवून वारंवार होणारी वीज कपात वीज टंचाई आणि लोड शेडिंग ची समस्या यावर उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने पीएम कुसुम सौर ऊर्जा योजना कार्यान्वित केली आहे. मात्र या कंपन्यांनी नेमलेले सब एजंट आणि त्यांचे सहाय्यक यांनी या योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असून काही लाभार्थ्यांच्या नावे मंजूर झालेले पंप रोख पैसे घेऊन दुसऱ्या शेतकऱ्यांना विकले आहेत विरोध करणाऱ्या लाभार्थ्यांना काही सब एजंटांच्या सहकाऱ्यांनी बंदुकीचा धाक दाखवल्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत.. या सर्व प्रकरणाची आणि आर्थिक घोटाळ्यातील सहभागी असणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.. अशी मागणी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी आज पोलीस स्टेशन आष्टी येथे जाऊन केली आहे..
या योजनेचे लाभार्थी राजेंद्र गोंदकर यांनी या प्रकरणी आष्टी पोलीस स्टेशन येथे रीतसर फिर्याद दाखल केली आहे.. याविषयीचे सविस्तर वृत्त असे की, शेती सिंचनासाठी पाण्याची नितांत गरज असून जगभरात एकूण लागवडीखालील जमिनीच्या 20% शेती सिंचन पद्धतीने केली जाते असून या संचित शेती तून जगभरात उत्पादित एकूण अन्नधान्यांमध्ये 40% योगदान या सिंचित शेतीतून होत आहे.
केवळ पावसावर आधारित शेती आणि सिंचित शेती याची तुलना केल्यास सिंचित शेतीतून दुप्पट उत्पादन मिळू शकते तसेच शेतीची उत्पादन क्षमता वाढून पिकात वैविधता येते महाराष्ट्रात कृषी क्षेत्रापैकी 80 टक्के क्षेत्र पावसावर अवलंबून आहे आणि जवळपास 70 टक्के शेतकरी अत्यल्प अल्पभूधारक वर्गात मोडतात त्यांच्यासाठी विजेवर चालणारे पंप आणि डिझेल पंप याचा वापर होतो. परंतु महाराष्ट्रातील बहुतांशी शेती दुर्गम मागास भागात असल्यामुळे विजेद्वारे चालणारे पंप वापरण्यास अडचण निर्माण होतात तसेच वारंवार होणारी वीज कपात, वीज टंचाई, लोड शेडिंग मुळे शेतकरी हैराण असल्यामुळे केंद्र शासनाने शासनाने पीएम कुसुम सौर ऊर्जा योजना ही योजना सुरू केली असून त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून नोंदणी करता येते लाभार्थी शेतकऱ्यास मंजुरीनंतर त्याच्या वाट्याची रक्कम भरावी लागते उर्वरित रक्कम केंद्र शासन कंपनीकडे भरत असते या ऑनलाइन पद्धतीमध्ये काम करणारे काही कंत्राटी कर्मचारी आणि काही वीज कर्मचारी यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये मंजूर झालेले पंप दुसरे शेतकऱ्यांना रोख पैसे घेऊन विकण्याचे प्रकार घडलेले आहेत काही शेतकऱ्यांनी याबाबत विरोध केला असता कंपन्यांचे नेमलेले सगळे त्यांचे सहकारी यांनी लाभार्थी शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून मंजूर पंप दुसऱ्या शेतकऱ्यांना रोख पैसे घेऊन विकल्याच्या घटना घडलेल्या आहेत पीएम कुसुम सौर घटक ब चे लाभार्थी असलेले तालुक्यातील केरूळ या गावचे शेतकरी राजेंद्र गोंदकर यांनी पोलीस स्टेशन मध्ये या गैरप्रकार बद्दल फिर्याद दाखल केली आहे आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये असे गैरप्रकार घडलेले आहेत कुसुम सौर योजनेचे महाराष्ट्र राज्यात काम करणाऱ्या 9 ते 10 कंपन्या असून सर्व कंपन्यांनी खाली नेमलेले एजंट यांनी हा महा घोटाळा केल्याचे दिसून येत असून त्यांना काही वीज वितरण कंपनीचे कर्मचारी देखील सामील झाल्याचे बोलले जात आहे या सर्व प्रकाराची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळा समवेत माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना कृषि वापरासाठी कुसुम घटक ब योजना उपलब्ध करुन देण्यात आली.मात्र या योजनेच्या मूळ लाभार्थ्यांना याचा लाभ न होता यामध्ये संबंधित कंपनीचे डिस्ट्रीब्यूटर याने संगनमताने चिरीमिरी घेऊन इतरांना ते सोलर पंप देण्याचा सपाटा लावला असल्याने आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याने या मागे असलेल्या मुख्य सुत्रधारावर कायदेशीर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी माजी मंत्री सुरेश धस यांनी केली आहे.
शेतकऱ्यांमध्ये सौर ऊर्जा निर्मितीला चालना देणे.शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीवर सौर पंप आणि सौर ऊर्जा संयंत्रे लावण्यासाठी प्रोत्साहन ज्यामुळे त्यांचे पारंपारिक उर्जा स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी होऊन शाश्वत कृषी पद्धतींना हातभार लावण्यासाठी पीएम-कुसुम योजना शेतकऱ्यांना लागू करण्यात आली.या योजनेअंतर्गत ३, ५ व ७.५ एच.पी क्षमतेचे सौर कृषिपंप ९० ते ९५ टक्के अनुदानावर उपलब्ध केले गेले.सौर कृषिपंपांसाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतक-यास १० टक्के आणि अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास ५ टक्के लाभार्थी हिस्सा भारण्यासाठीचा असतो.या योजनेचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरल्यानंतर संबंधित विभागामार्फत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मेसेजच्या माध्यमातून कळविण्यात येते. त्यानंतर संबंधित लाभार्थी शेतकरी कोणत्या कंपनीचा सोलर घ्यायचा याची निवड करून संबंधित विभागाला कळवतो. तदनंतर सदर कंपनीचा डिस्ट्रीब्यूटर आणि महावितरणच्या वायरमनला पुढील ६० दिवसाच्या आत सौर पंप बसवणे अनिवार्य असते. मात्र यामध्ये आष्टी तालुक्यात मोठे गौडबंगाल उघडकीस आले असून यामध्ये संबंधित डिस्ट्रीब्यूटर आपल्या स्तरावरून लाभार्थ्यांपर्यंत हा सौर पंप न जाऊ देता याची परस्पर इतरांना विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत अनेक शेतकऱ्यांनी सदरील कंपनी डिस्ट्रीब्यूटर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया हातात घेतली असून यामध्ये आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत माजी मंत्री धस यांनी शेतकऱ्यांसह आष्टी पोलीस ठाणे तसेच महावितरण कार्यालयात धाव घेत याबाबत सखोल माहिती घेत संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
” पीएम कुसुम सौर योजनेचे लाभार्थी यांना ऑनलाइन पद्धतीने मंजुरीचे मिळालेले पत्र आणि त्यांच्या मंजुरीचे सौर यंत्र दुसऱ्या शेतकऱ्याकडे बसवले असल्याबाबतचा प्राथमिक पुराव्या बाबतचे कागदपत्र मागवले आहेत तपासणी नंतर लगेचच गुन्हा दाखल करण्यात येईल “
सोमनाथ जाधव ,पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आष्टी