2.9 C
New York
Tuesday, December 3, 2024

Buy now

परळी विधानसभा लढण्यास तयार : अभिजीत देशमुख

परळी विधानसभा लढण्यास तयार : अभिजीत देशमुख

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-

पक्षाने संधी दिल्यास परळी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे युवक नेते व पक्षाच्या युवा आघाडीचे माजी प्रदेश सरचिटणीस अभिजीत उत्तमराव देशमुख तसेच महाराष्ट्रा शेतकरी शुगर, ली (सायखेडा). आत्ताचा-21 शुगर, यूनिट-2 चे संस्थापक अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री देशमुख यांच्या गणेशपार भागातील “विठाई निवास” ह्या त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (दि. ११) ही पत्रकार परिषद झाली. श्री देशमुख म्हणाले, परळीच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात माझे काका माजी नगराध्यक्ष कै. एन. के. देशमुख (मालक) यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे. परळी पालिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी शहराच्या सर्वांगिण विकासासाठी विविध विकास योजना कार्यान्वित केल्या, शासन दरबारी आपले संबंध वापरून त्यांनी शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणला, परळीचा सर्वांगिण विकास करण्यात कै. एन. के. देशमुख (मालक) यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी परळी शहराच्या विकासासाठी केलेले कार्य परळीकर कधीही विसरू शकनार नाही. कै.एन. के. देशमुख मालकांचा वारसा पुढे चालवण्यासाठी श्री अभिजीत देशमुख यांनी परळीच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आणी गेल्या दोन दशकांपासून परळीच्या व्यापार उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले अभिजीत देशमुख यांनी परळी परिसरातील सायखेडा (ता. सोनपेठ) येथे महाराष्ट्र शेतकरी शुगर या साखर कारखान्याची उभारणी केली. हा कारखाना अखंडपणे सुरू रहावा, शेतकऱ्यांचे हित साधले जावे म्हणून हा कारखाना हस्तांतरित केला.

आगामी परळी विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छूक आहोत, इतर इच्छुक उमेदवारांबरोबरच आपलीही पक्षाने दखल घेवून मुलाखतीसाठी आपल्याला मुंबईत पक्ष कार्यालयात बोलावून घेतले होते. या निवडणुकीसाठी आपण इच्छूक असून पक्षाने संधी दिल्यास आपण ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत असे श्री अभिजीत देशमुख यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, परळी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब, आमदार रोहितदादा पवार, मा.ना. श्री. बजरंग बप्पा सोनवणे मा. श्री. मेहबूब शेख युवक अध्यक्ष राष्ट्रवादि प्रदेश काँग्रेस शरतचंद्र पवार. यांच्यासोबत आपली चर्चाही झाली असल्याचे अभिजीत देशमुख यांनी सांगितले. परळी-तील व परळी मतदार संघातील सामाजिक, राजकीय विषयावर मा. शरदचंद्र पवार साहेब व रोहितदादा पवार यांनी आपल्याबरोबर चर्चा केल्याचे श्री देशमुख म्हणाले. येणाऱ्या काळात मला जे काही शक्य होईल तेवढे काम मी परळी वैजनाथ मतदार संघातील माझ्या मायबाप जनते साठी करेल. असे देशमुख म्हणाले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या