16 C
New York
Thursday, September 24, 2026

Buy now

परळीत दोन गटांत वाद, थेट पोलीस ठाण्याच्या समोरच मारहाण ! ल12 नावासह 15 ते 20 जणांवर कारवाई

परळीत दोन गटांत वाद, थेट पोलीस ठाण्याच्या आवारात तुफान मारहाण राडा!

संभाजीनगर पोलीस ठाण्यात 12 नावासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल

ANC _परळी येथील रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या भांडणानंतर दोन गट थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातच सार्वजनिक शांतता भंग करत आपापसात मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी संभाजी नगर पोलीस ठाण्यात 12 व्यक्तींसह इतर 15 ते 20 अनोळखी लोकांवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 194(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:00 वाजण्याच्या सुमारास परळी रेल्वे स्टेशन परिसरात दोन गटांत जोरदार भांडण सुरू असल्याची माहिती ‘डायल 112’ वर तैनात पोलीस अंमलदार गणेश येरडलावार यांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

तेथे आदित्य सुरेश शिंदे, रोहन इंद्रजित विभुते आणि आदित्य सुरेश विभुते यांच्यात आपापसात वाद सुरू होता. पोलिसांनी दोन्ही गटांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.

दोन्ही गटांतील लोक रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास आपापले नातेवाईक व मित्रांना सोबत घेऊन संभाजी नगर पोलीस ठाण्यात आले. मात्र, तक्रार देण्याऐवजी दोन्ही गट पोलीस ठाण्याच्या आवारातच पुन्हा भिडले. त्यांनी एकमेकांना मारहाण व शिवीगाळ करत तुफान राडा केला.

​या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.

​या प्रकरणी पोलीस अंमलदार गणेश येरडलावार यांच्या फिर्यादीवरून

15 ते 20 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ठाकूर करत आहेत.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या