2001 पूर्वीच्या वरिष्ठ 78 महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा ! प्राचार्य डॉ. बी. डी. मुंडे
महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या मागण्यांचे अजीतदादांना पत्र
परळी : प्रतिनिधी
2001 पूर्वीच्या वरिष्ठ 78 महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा अशा आशयाची मागणी महाराष्ट्र राज्य कृती समितीने अजितदादा पवार यांचे कडे केली आहे. या पत्रात म्हंटले आहे क, साहेब, आम्ही महाराष्ट्र राज्य कृती समिती (मुंडे) च्या वतीने आपणास नम्र विनंती करतो आहे की, सदर महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देण्यासंदर्भात गेली तीन वर्षापासून आपण टाळाटाळीची उत्तरे देऊन केवळ खेळवत ठेवलेलं आहे. आमच्या या सदर महाविद्यालयांची अनुदान देण्यासंदर्भातील आपल्या शासकीय पातळीवरून तीन ते चार वेळा तपासणी ही पूर्ण झालेली आहे. तरीही, अद्यापही आपण हा निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. साहेब आमचा सहनशीलतेचा अंत आता संपलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी महायुतीचा किंवा आपल्या पक्षाचा एकही उमेदवार फिरू देणार नाही. निवडणुकीमध्ये आम्ही हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी आपल्याला योग्य ती जागा दाखवून देईल.
गेली तेवीस वर्षांपासून उध्वस्त झालेल्या आपल्या लाडक्या भावा-बहिणींचं आयुष्य आपल्या या निर्णयाद्वारे उभा करून त्यांना आपण न्याय द्यावा. ही नम्र विनंती…..!!!
आपण आमच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीच्या वरिष्ठ महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तात्काळ घ्यावा. ही पुन्हा एकदा आमची नम्र विनंती आहे.
अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने प्राचार्य डॉ. बी. डी. मुंडे यांनी अजीतदादांना पवार यांना पाठवण्यात आले आहे.