25.4 C
New York
Friday, April 25, 2025

Buy now

नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील-छगन भुजबळांचे समर्थक आमने-सामने

नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील-छगन भुजबळांचे समर्थक आमने-सामने

 

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला

 

नाशिक : वृत्तसंस्था

 

नाशिकमध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांचे समर्थक आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसृष्टी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं बघायला मिळालं आहे. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

मनोज जरांगे पाटील नाशिकमधील शिवसृष्टीला भेट देण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी छगन भुजबळ यांचे समर्थकही याठिकाणी उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील या परिसरात दाखल होताच, दोन्ही गटाच्या समर्थकांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता .

 

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या