5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

निष्ठावान शिलेदार महेबुब शेख यांच्या प्रचारार्थ खा सुप्रिया सुळे यांची कडा येथे आज जाहीर सभा मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – अॅड रिजवान शेख

निष्ठावान शिलेदार महेबुब शेख यांच्या प्रचारार्थ खा सुप्रिया सुळे यांची कडा येथे आज जाहीर सभा मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – अॅड रिजवान शेख            

कडा!( प्रतिनिधी )

महाविकास आघाडीचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेबुब शेख यांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवार दि १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता कडा येथील मौलाली बाबा दर्गा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खा सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा होणार असून या सभेस खा निलेश लंके,खा बजरंग सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश सचिव ॲड रिजवान शेख यांनी केले आहे.

आष्टी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार महेबुब शेख यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला असून युवक व सर्व सामान्य नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सदरील निवडणूक ही जनतेने हातात घेतली असल्याने महेबुब शेख यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यांच्या प्रचारार्थ खा सुप्रिया सुळे यांची कडा येथे उद्या शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता मौलाली बाबा दर्गा येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून खा निलेश लंके खा बजरंग सोनवणे यांची उपस्थिती राहणार आहे.आष्टी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला , शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश सचिव ॲड रिजवान शेख, अल्पसंख्याक विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ नदीम शेख, युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हा कार्याध्यक्ष राहुल काकडे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष जिशान सय्यद यांनी केले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या