5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

माझ्या आणि विरोधकाच्या विकासाचा लेखाजोखा घेऊन मतदान करावे

माझ्या आणि विरोधकाच्या विकासाचा लेखाजोखा घेऊन मतदान करावे

प्रचार दौऱ्यात आमदार बाळासाहेब आजबे यांचे मतदारांना आव्हान

आष्टी प्रतिनिधी: गेली पाच वर्ष मी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या पाच वर्षाच्या काळात मी आमदार म्हणून खेड्यापाड्यापर्यंत विकास पोहोचवला आहे. विरोधक हे वीस वीस वर्ष आमदार राहिलेले आहेत. त्यांच्या वीस वर्षाच्या कार्यकाळात आणि माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामाचा लेखाजोखा घेऊनच मतदारांनी मला मतदान करावे असे आवाहन आ. बाळासाहेब आजबे यांनी प्रचार दौऱ्यातून केले आहे.
आ. बाळासाहेब आजबे यांचा प्रचार दौरा आज आंधळेवाडी, हरिनारायण आष्टा, चिंचपूर, मातावळी, मातकुळी, वनेवाडी, कऱ्हेवाडी,पांगुळगव्हाण आणि करंजी येथे संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब म्हणाले की, आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार म्हणून काम करत असताना मी लहानात लहान वाड्या वस्त्यांपर्यंत विकास कामे पोहोचवले आहेत. मतदारसंघातील एकही गाव नाही ती त्या गावांमध्ये मी विकास काम केले नाही. परंतु विरोधक वीस वीस वर्ष मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत. आमदार असताना त्यांनी कोणतेही विकास कामे केलेली नाहीत. त्यांच्या काळात जे विकास कामे झाली आहेत ती निकृष्ट दर्जाची झाली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी बोगस कामे करून वकल गायब करण्याचा कार्यक्रम विरोधकांनी राबवला आहे. आष्टी – खडकत रस्त्याला अनेक वेळा निधी आणला. परंतु हा रस्ता कधीच चांगला झाला नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारची जल जिवन योजना राबवताना देखील मोठ्या प्रमाणात आष्टी विधानसभा मतदारसंघात भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची देखील चौकशी लावली जाईल. माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील दोन वर्ष कोविड सारख्या महामारीत गेली तर एक वर्ष विरोधी बाकावर गेले सत्तेत फक्त दोन वर्षे राहिलोत. या दोन वर्षांमध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी अडीच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. इतका निधी विरोधकांच्या वीस वर्षाच्या कार्यकाळातही आला नाही. त्यामुळे मतदारांनी मी पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामाचा आणि विरोधकांच्या वीस वर्षातील विकास कामांचा लेखाजोखा घेऊनच मतदान करावे. पुढील काळात आष्टी तालुका बागायत करण्यासाठी आपण आष्टी तालुक्याच्या हक्काचे राहिलेले चार टीएमसी पाणी मिळवून देणार आहे. मतदार संघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी मतदारांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत असे आवाहनही आ. बाळासाहेब आजबे यांनी प्रचार दौऱ्या दरम्यान केले आहे.

 

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या