-4.5 C
New York
Friday, January 16, 2026

Buy now

धनंजय मुंडे यांनी ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ यांचे दुग्धाभिषेक करून घेतले दर्शन

धनंजय मुंडे यांनी ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ यांचे दुग्धाभिषेक करून घेतले दर्शन

परळी

परळी विधानसभेचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आज सकाळी आठ वाजता बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ यांचे दुग्धाभिषेक करून दर्शन घेतले.

राज्यात यावर्षी महायुतीचा विजय निश्चित असून महायुतीला निर्विवाद व स्पष्ट बहुमत मिळेल व महायुतीची सत्ता स्थापन होईल असा विश्वास यावेळी धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

एका माध्यम प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले की, विरोधकांकडून सातत्याने परळीच्या मातीचा व इथल्या मातीतील माणसांचा बोगस मतदान करणारे लोक असे म्हणून अपमान केला जातो आहे.

सातत्याने गुंडगिरी व दहशतीचे असे म्हणून परळीची बदनामी केली जात आहे. त्यामुळे इथल्या जनतेत रोष आहे आणि तो रोष इथली जनता मतपेटीतून व्यक्त करेल व विकासाच्या आणि कामाच्या माणसाच्या पाठीशी राहील असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या