धनंजय मुंडे यांच्या विजयानंतर शोभाताई भास्कर चाटे (नगरसेवक) यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर भागातील महिलांनी साजरा केला विजयोत्सव
परळीत ओन्ली डीएम चा नारा
शोभाताई भास्कर चाटे नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली
शिवाजीनगर भागातील महिलांनी धनंजय मुंडे प्रचंड बहुमताने विजय झाल्यानंतर पेढे व फटाके वाजवून जल्लोष साजरा केला
परळी : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत बघायला मिळाली. शरद पवार स्वत:मैदानात उतरल्यामुळे परळीत मुंडेंचं टेन्शन वाढलं होतं.पण आता पुन्हा एकदा धनजंय मुंडेंनी बाजी मारली
यंदाची विधानसभा निवडणुक महायुतीसह महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळाली होती.
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत बघायला मिळाली.
दरम्यान परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे. त्यांनी तब्बल १ लाख ४० हजारा पेक्षा जास्त मताची आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केला. यामुळेच मुंडे यांचे कार्यकर्ते, परळीत ‘ओन्ली डीएम’ चा नारा परळीत ऐकायला मिळत होता.