क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ पुरस्काराने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
सृष्टी सेवा भावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम…
कडा । प्रतिनिधी – सोपान पगारे
सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंबाजोगाई आयोजीत राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२५ चे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन पुणे येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर, माई सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
बाल शाहीर कु. ओवी प्रसाद काळे हिने राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर पोवाडा सादर केला. प्रमुख पाहुण्या डॉ. स्मिता बारवकर यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा मिनाक्षी डोंगरे यांनी केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती अनिताताई काळे यांचा सत्कार सौ. भारती एकलारे यांनी केला. सौ. संगीता शिंदे यांचा सत्कार सौ. सुवर्णा पाटकर यांनी केला. श्रीमती तृप्ती धवन यांचा सत्कार मौ. मनिषा चव्हाण यांनी केला. मा. विद्याताई गडाख यांचा सत्कार सौ. त्रिवेणी मोघे यांनी केला. श्रीमती अर्चनाताई सावंत यांचा सत्कार सौ. मीनाक्षी डोंगरे यांनी केला.श्रीमती रेश्माताई जगताप यांचा सत्कार सौ. भारती एकलारे यांनी केला. प्रास्ताविक संस्थेच्या सचिव सौ. भारती एकलारे यांनी केला. विद्याताई गडाख यांनी राजमाता जिजाऊ व कांतीज्योती सावित्रीबाई फले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. मा.अर्चनाताई सावंत यांचे कार्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे. मा. रेशमा जगताप यांनी महिलांनी सामाजिक कार्य करण्यासाठी सक्षम पाऊले उचलणे आवश्यक असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात शिवमती अनिता काळे यांनी कार्तीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनपट व राजमाता जिजाऊ यांचे स्वराज्य घडविण्यात असलेले योगदानाची माहिती दिली. महिलांनी वाचन करून प्रगल्भ विचार अवलंबून सक्षम व्हावे सामाजिक कार्य करण्यासाठी सक्षम पाऊल उचलावे, सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे कार्य महिलांसाठी प्रेरणादायक आहे असे प्रतिपादन केले.
विविध क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगीता खिलारे, सिंधू गणेश बामणे, मौ. सुवर्णा पाटकर, वैशाली वाळके, सौ. वर्षा काळे, आरिफ बिलावर शेख,रोहिणी पवार, कु.आकांक्षा पेडगावकर, सुभांगिनी टेकाडे, शेख नमीम मुहम्मद इब्राहीम, दिपाली शेळके,रेश्माताई जगताप, सौ. सुवर्ण मोरे, सौ. सुवर्णा खंडागळे, सौ. मेघा लोहार, सौ. मनीषा चव्हाण, कु. मानसी बनसोडे, श्रावणी (चिया) कामत. शर्मिला नलावडे, सौ. साधना गायकवाड, सुवर्णा पोटफोडे, विद्याताई गडाख, शिवमती अनिता काळे, डॉ. स्मिता बारवकर, अर्चना सावंत, सौ. संगीता शिंदे, सौ. अर्चना ठाकूर, सुरैय्या परवीन एस. जहागीरदार राजमाता जिजाऊ पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.सौ. निर्मला बनसोडे, सौ. सुषमा म्हस्के, नूतन शिंदे, प्रेमिका तुरेराव, मा.तृप्ती धवन, मा.वर्ष चव्हाण, जयश्री आगलावे, मा.रेखा भेगडे, सौ. नीलम परदेशी, मा.प्रज्ञा आबनावे, सौ. विजया महाडिक, कु. ओवी काळे, सौ. ज्योती कोपर्डे, अजिता एडके, सौ. हिरा शहापुरे, सौ. विभावरी गुरव, प्रतिभा भिसेपाटील, सौ. योगिता कोठेकर, अनघलक्ष्मी दुर्ग, तेजस्विनी कदम, कामिनी टकले, डॉ. स्मिता भंगाळे, सौ. माधुरी कुलकर्णी या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्षा सौ. मीनाक्षी डोंगरे, उपाध्यक्ष मौ. माधुरी माळवे, मचिव भारती एकलारे, संचालक मंडळ, विकास डोंगरे यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.