आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग सरळ सेवा भरती व पोलीस भरती परीक्षेच्या शासनाच्या विविध विभागात शासकीय सेवेत निवड झालेल्या गुणवंतांचा नुकताच आ.सुरेश धस यांच्या हस्ते गुणवंतांच्या माता पित्यांसह सत्कार करण्यात आला.
आष्टी तालुक्यातील आदर्शगाव आनंदवाडी – सराटेवडगांव येथील मुबीन युसूफ शेख, कु.ऋषाली कल्याण झांबरे हे दोघेही मुंबई पोलीस भरती झाल्याने.त्यांचा आ. सुरेश धस यांचे हस्ते आष्टी येथील त्यांचे निवासस्थानी सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास गुणवंतांचे आई वडील शेख बाबा उर्फ वयुसुफ आणि कल्याण झांबरे, पंचायत समीतीचे माजी सदस्य भानुदास बोडखे, उपसरपंच पवन तरटे,ग्रा.पं. ज्ञसदस्य सोमीनाथ सुंबरे, मनोज झांबरे, विनोद तरटे आदि मान्यवर उपस्थित होते.
आनंदवाडी – सराटेवडगावचे शेख व झांबरे यांची मुंबई पोलीस म्हणुन निवड झाल्याबद्दल आ.धस यांच्याकडुन सत्कार
https://atulyamaharashtra.com/