माजी आ.शहाजीबापू पाटील आणि पत्रकार उत्तम बोडखे रमले गप्पात
सांगोला (प्रतिनिधी)
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या धामधुमीनंतर विविध घटना प्रसंग गाजत असल्याने राजकीय कार्यकर्ते,नेते,पत्रकार आणि विविध घटकांमध्ये प्रचंड चर्चा यांना उधाण आलेले दिसत आहे.
काल सांगोला येथे धोंडे आणि लिंगे परिवाराचा शुभविवाह सोहळा थाटात संपन्न होत होता.या शुभविवाह सोहळ्यासाठी परिसरातील राजकीय, सामाजिक,धार्मिक, वैचारिक आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर यांची आवर्जून उपस्थित होती.या सोहळ्यासाठी “काय तो डोंगर… काय ती झाडी….” या वाक्याने महाराष्ट्रात फेमस झालेले माजी आ.शहाजीबापू पाटील यांची उपस्थिती होती तर बीड येथील अनेक पाहुणे नातेवाईक मित्र मंडळी यामध्ये जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांची उपस्थिती होती.या लग्न समारंभाच्या मंडपामध्ये माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,संपतराव धोंडे,रमेशशेठ धोंडे यांच्यासह मित्र कंपनीमध्ये अनेक गप्पा आणि विविध चर्चा रंगलेली दिसून आली.दरम्यान, चर्चा आणि संवादानंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मानसोक्तपणे आपली रांगडी फोटोसाठी पोज ही दिली.एकूणच,विवाह समारंभाला तिथी असल्याने विविध मंगल कार्यालय आणि लॉन्समध्ये सुरुवात झाली असून राजकीय कार्यकर्ते, नेते,व्यापारी,पत्रकार,लेखक, शेतकरी,कामगार यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्ती नववधूवरांना विवाह सोहळ्यात आशीर्वाद देण्यासाठी एकत्र येत आहेत.यामध्ये चर्चांना मात्र प्रचंड ऊत आलेला दिसत आहे.