भगवंताच जास्तीत जास्त नामस्मरण करावं ह.भ.प. ओम महाराज वानखेडे
उकळेश्वर महादेव देवस्थान उकळी पेन येथे ओम महाराज वानखेडे यांची कीर्तन सेवा संपन्न
वाशिम – प्रतिनिधी
महाशिवरात्रीनिमित्त उकळेश्वर महादेव देवस्थान उकळी पेन जिल्हा वाशिम येथे संगीत श्री शिव पुराण कथा सुरू असून यावेळी या शिवपुराण कथेत कीर्तन सेवा सुद्धा सुरू आहे.
वाशिम जिल्ह्यातील उकळी पेंड येथे महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त उकळेश्वर महादेव देवस्थान येथे आयोजित शिवपुरान कथेतील कीर्तनाच्या सेवेमध्ये हरिभक्त परायण ओम महाराज वानखेडे (भागवताचार्य विठ्ठल महाराज आश्रम आळंदी) यांनी आपल्या कीर्तन पर सेवेमध्ये
सकळासी येथे आहे अधिकार | कलियुगी उद्धार हरीच्या नामे ||
ह.भ.प ओम महाराज वानखेडे सवनेकर यांनी काल रात्री झालेल्या श्री क्षेत्र उकळी ता.जी वाशिम या ठिकाणच्या कीर्तन सेवेतून कलियुगाच्या वाढत्या प्रभावामुळे आपण नामसाधनेकडे
दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला वाटत असेल की आपला उद्धार व्हावा तर आपल्याला भगवंताच जास्तीत जास्त नामस्मरण करावं लागेल असेही यावेळी त्यांनी सांगितलं.
विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा ||
हा सुख सोहळा स्वर्गी नाही |
असा अत्यंत महत्त्वाचा संदेश यावेळी कीर्तनाच्या निरुपणामध्ये महाराजांनी दिला.