गोंदिया. प्रतिनिधी सडक अर्जुनी.
सौंदड : – येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य . व उच्च माध्य.विद्यालय, सौंदड येथे दि.27 फेब्रुवारी 2025 रोज गुरुवारला संस्थापक संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने कवी वि. वा. शिरवाडकर यांची जयंती विद्यालयाच्या प्राचार्या मा. उमा बाच्छल, पर्यवेक्षक मा. डी . एस.टेंभुर्णे, प्राध्यापक मा .आर .एन. अग्रवाल , स. शि. सौ.के.एस. काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी कवि वि. वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्रपण केले. कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी केली जाते.विद्यालयाच्या प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की विद्यार्थ्यांनी सुद्धा कुसुमाग्रज यांचे जीवन चरित्र अंगीकृत करावे. विद्यालयातील के.एस.काळे यांनी विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाला शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन टी.टी.निमजे यांनी केले तर आभार एन.डी.अलोणे यांनी मानले.