आष्टी, प्रतिनिधी
आष्टी मतदारसंघातील एम आर इ जी एस अंतर्गत करण्यात आलेले पांदण रस्ते व वैयक्तिक लाभाचे कामे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत तर पाठीमागे करण्यात आलेल्या कामांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्राप्त झाला असून गेली चार महिन्यापासून हा निधी संबंधित तहसील कार्यालयात वितरित करण्यात आलेला नाही तसेच आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील विविध विकास कामे मंजूर असून त्यांच्या वर्कऑर्डर झाले आहेत ते कामेही बंद ठेवण्यात आले आहेत तर झालेल्या कामांची बिले ही लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जाणीवपूर्वक आडवले जात आहेत या सर्व बाबींच्या विरोधात आपण गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे शेतकरी सरपंच उपसरपंच व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपोषणाला बसणार असून या उपोषणास आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात आपल्या मागण्यांचे व उपोषणाच्या संदर्भात लेखी निवेदन जिल्हाधिकारी बीड यांना दिले आहे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती स्तरावरील वैयक्तिक लाभाची त्याचप्रमाणे सार्वजनिक लाभाचे मस्टर कुठलेही कारण नसताना ठराविक गावाचे बंद करण्यात आले आहेत तसेच जिल्हा परिषद बीड बांधकाम विभाग क्रमांक एक अंतर्गत मंजूर असलेले व वर्क ऑर्डर झालेले कामे अधिकारी यांनी जाणीवपूर्वक थांबवले आहेत जिल्हा परिषद अंतर्गत लघु पाटबंधारे विभाग येथे मंजूर कामांची निविदा थांबवण्यात आलेले आहेत जिल्हा नियोजन अंतर्गत जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग यांच्याकडील कामे वर्क ऑर्डर होऊ नही थांबविले आहेत या कामाची मुदत मार्च 2025 रोजी संपत आहे जलसंधारण विभाग अंतर्गत वर्क ऑर्डर झालेले कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे सीनाब जवळपास 55 कामे वर्क ऑर्डर होऊनही सुरू करण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन अंतर्गत जिल्हा नियोजन विभाग व 25 15 अंतर्गत कामे होऊ नये सदरील कामांचे बिले अदा करण्यात आलेली नाहीत यावरील सर्व कामाबाबत अधिकारी हे कोणाच्या दबावाला बळी पडत आहेत व कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी हे कामे अडवले आहेत या सर्व बाबींची जिल्हाधिकारी बीड यांनी दखल घेऊन तात्काळ हे कामे सुरू करावीत व आलेला निधी वितरित करावा अशी मागणी आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी वारंवार जिल्हाधिकारी बीड यांच्याकडेही केली आहे त्यामुळे दोन दिवसात या सर्व मागण्या मान्य न झाल्यास आपण हजारो कार्यकर्त्यांच्या व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकार्यालय बीड येथे गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता उपोषणास बसणार आहोत अशी माहिती आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिली आहे. तसे लेखी पत्र माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी 25 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी बीड यांना दिले आहे.