31.1 C
New York
Monday, August 11, 2025

Buy now

*चिचटोला ते हेटी या मार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदावर कारवाईची मागणी**

‌ गोंदिया प्रतिनिधी ‌

सडकअर्जुनी:–

  1. तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या चिचटोला ते हेटी या मार्गाचे काम ८ महिने लोटूनही अपूर्ण आहे.या मार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने हेटी ते चिचटोला, कोसमतोंडी वळणापर्यंत रस्ता दुरुस्ती व रुंदीकरण डांबरीकरणाचे काम ८महिन्यापूर्वी केले.मात्र संबंधित कंत्राटदाराने तीन किमी.रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडेला अजूनही मुरूमाची साईडींग न केल्याने या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या वाहन चालकांना कमालीची कसरत करावी लागत आहे.विशेष करून चारचाकी वाहनाला साईड देतांनी अनेक वेळा तोल घसरुन अपघात होऊन प्रवाशी जखमी झाले आहेत.तर पावसाळ्यात एसटी बस साईड देत असतांनी दोन्ही वाहन साइडला फसल्यामुळे १०-१२ तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.यावेळी शेतकऱ्यांना खुपचं त्रास सहन करावा लागला.तसेच हेटी,गिरोला,टेमनी येथील नागरिक कोसमतोंडी येथे शासकीय व शेतीच्या कामासाठी आणि शाळकरी मुले शिक्षणासाठी येत असतात. त्या या मार्गाने ये -जा करतांनी कमालीचा त्रास सहन करावा लागतो.सदर काम सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया अंतर्गत असून संबंधित विभागाकडे काम करणाऱ्या कंत्राटदारावर रस्ता दुरुस्ती, रूंदीकरण व मुरूम साईडींग न भरल्याने संबंधित विभाग कारवाई करणार का? अशी मागणी हेटी येथील सरपंच प्रविण गहाणे, उपसरपंच महेश शेंडे,ग्रा.प.सदस्य अनिल मानकर ,मनोहर गहाणे यांनी केली आहे.
https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या