23.1 C
New York
Thursday, August 14, 2025

Buy now

बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी विशाल साळुंके यांची फेरनिवड :गजानन मुडेगावकर नवे कार्याध्यक्ष

बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी विशाल साळुंके यांची फेरनिवड :गजानन मुडेगावकर नवे कार्याध्यक्ष

 

 

मुंबई :

बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी विशाल साळुंके यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून अंबाजोगाई येथील पत्रकार गजानन मुडेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी आज ही घोषणा केली.
बीड जिल्हा पत्रकार परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपली आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांसाठी नवी कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.आज काही पदांच्या नियुक्तया जाहीर करण्यात येत असल्या तरी उर्वरित पदाच्या नियुक्तया नवी कार्यकारिणी परिषदेशी चर्चा करून जाहीर करेल.
नियुक्तया करताना नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून गजानन मुडेगावकर, सरचिटणीस म्हणून गेवराई येथील सुभाष सुतार आणि कोषाध्यक्ष म्हणून परळी येथील धनंजय आरबुने यांची तर उपाध्यक्षपदी पाटोदा येथील सचिन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाईल अशी घोषणा मिलिंद अष्टीवकर यांनी केली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांचे एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, परिषदेचे विभागीय सचिव रवी उबाळे, विभागीय समन्वयक सुभाष चौरे ,परिषद प्रतिनिधी विलास डोळसे यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या