माजी आ.बाळासाहेब आजबे यांनी घेतला गटविकास अधिकाऱ्याचा क्लास
मनरेगा कामाबाबत असलेल्या तक्रारीबाबत कर्मचाऱ्यांची केली कान उघडनी
आष्टी प्रतिनिधी – आष्टी पंचायत समितीच्या अंतर्गत सुरू असलेल्या मनरेगा योजनेअंतर्गत जलसिंचन विहिरी, शेत तलाव या वैयक्तिक लाभाच्या कामांबाबत पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत माजी आ. बाळासाहेब आजबे यांच्याकडे अनेक लाभार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन माजी आ. बाळासाहेब आजबे यांनी पंचायत समिती कार्यालयात जाऊन गटविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला. विविध प्रश्नावर गटविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरून लोकांची कामे वेळेत करून देण्याबाबत सूचना केल्या आहेत.
आष्टी पंचायत समितीच्या अंतर्गत मनरेगा योजनेतून तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी, शेत तलाव या वैयक्तिक लाभांचे कामे सुरू आहेत. परंतु आष्टी पंचायत समितीचे कर्मचारी काही ठिकाणी दुजाभाव करत असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी ठराविक ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांचे मस्टर न भरणे त्याचबरोबर मस्टर भरण्यासाठी पैसे घेणे हा मुद्दा माजी आ. बाळासाहेब आजबे यांनी लावून धरत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी माजी आ. बाळासाहेब आजबे यांनी या भेटीत आष्टी तालुक्यात मनरेगा अंतर्गत मंजूर असलेले वैयक्तिक लाभाचे शेततलाव, जलसिंचन विहिरी व सार्वजनिक पांदन रस्ते आदी कामांचे मस्टर सुरू करावेत. तसेच आष्टी तालुक्यातील काही ग्रामपंचायतचे मस्टर जाणीवपूर्वक थांबवण्यात आल्याचे गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. विकास कामाबाबत कुठलाही भेदभाव सहन केला जाणार नाही असा इशारा देऊन कर्मचाऱ्यांना समज देण्यात यावी असे स्पष्ट निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
चौकट
माजी आ. आजबेंनी या मुद्द्यावर धरले धारेवर
@ ज्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी आणि शेत तलावाचे मनरेगा मधून काम चालू आहे या शेतकऱ्यांकडून मस्टर भरण्यासाठी कर्मचारी पैसे घेत असल्याचा आरोप माजी आमदार आजबेंनी केला.
@ काही ग्रामपंचायत चे जाणून-बुजून मनरेगाचे कामे आडून ठेवले आहेत. त्या ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वैयक्तिक लाभार्थ्यांची मस्टर भरले जात नाहीत. असा दुजाभाव कर्मचारी आणि अधिकारी करत आहेत तो दुजाभाव खपवून घेतला जाणार नाही. असे म्हणत माजी आ. आजबेंनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी सुनावले.
@ आष्टी तालुक्यातील सार्वजनिक पांदन रस्त्यांचे कामे जाणून-बुजून अडवून ठेवलेले आहे. हे कामे लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत असे निर्देश आष्टीचे गटविकास अधिकारी यांना माजी आ. बाळासाहेब आजबे दिले आहे.