इंडिया बँकेच्या अर्थसहाय्याने भगवान साकसमुद्रे यांना नेक्सन गाडी सुपूर्त
परळी /प्रतिनिधी
स्टेट बँक ऑफ इंडिया (इंडिया बँक) शाखा परळीच्या वतीने अर्थसहाय्य पुरवण्यात आलेली टाटा मोटर्सची नवीन नेक्सन प्युअर सीएनजी गाडी प्रख्यात कंत्राटदार इंजि. भगवान साकसमुद्रे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आली.
शहरातील गोविंद कार्स (मोटर्स) या अधिकृत शोरूममधून ही टाटा मोटर्स कंपनीची नेक्सन प्युअर सीएनजी गाडी खरेदी करण्यात आली आहे. या गाडीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, परळी शाखेने अर्थसहाय्य केले. बँकेचे शाखा व्यवस्थापक विजय तिरपुडे यांनी नुकतेच या गाडीच्या चाव्या कंत्राटदार इंजि. भगवान साकसमुद्रे यांच्याकडे सुपूर्द केल्या.इंडिया बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळाल्याने इंजि.साकसमुद्रे यांनी बँकेचे आभार मानले.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी शाखा व्यवस्थापक विजय तिरपुडे यांच्यासह बँकेचे अधिकारी नागोराव देशमुख, प्रिया मार्कंडे, सचिन दहिफळे, गोविंद कारचे राम काळे, दत्तामामा तसेच उद्योजक श्री. बायस, श्री. राठोड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.