31.2 C
New York
Wednesday, June 25, 2025

Buy now

परळीतील व्यसनमुक्तीसाठी लढणाऱ्या पत्रकारांचा गौरव

परळीतील व्यसनमुक्तीसाठी लढणाऱ्या पत्रकारांचा गौरव :

दीपक नाना देशमुख यांच्या संस्थेचा अभिनव उपक्रम

 

परळी (प्रतिनिधी) —

परळी शहरातील व्यसनाधीन अल्पवयीन मुलांवर गंभीर स्वरूपात परिणाम होत आहेत. गतीमान जीवनशैलीत वाढती व्यसनाधीनता हे समाजासाठी चिंतेचे कारण ठरत आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाची लागण ही भविष्यासमोरील एक गंभीर आपत्ती बनली आहे. या पार्श्वभूमीवर परळी शहरात सप्तशृंगी दुर्गा सेवाभावी संस्था आणि व्यसनमुक्ती केंद्र व नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या व्यसनमुक्ती च्या लढ्यास
सप्तशृंगी दुर्गा सेवाभावी संस्थेच्यावतीने दैनिक पुण्यनगरीचे ज्येष्ठ पत्रकार धनंजय आरबुने आणि अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे संपादक नितीन ढाकणे यांनी व्यसनाधीनतेविरोधात केलेले निर्भीड वृत्तांकन आणि समाजहिताचा आवाज बनलेल्या लिखाणामुळे त्यांना हा गौरव करण्यात आला.

सत्कार प्रसंगी नितीन चव्हाण, पत्रकार अनंत कुलकर्णी तसेच संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. व्यसनमुक्तीसाठी सुरू असलेल्या कार्यात माध्यमांनी घेतलेली सक्रिय भूमिका हीच खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाची ग्वाही असून
व्यसनमुक्तीचा लढा हा केवळ सरकारी यंत्रणांचा नव्हे, तर प्रत्येक सुजाण पत्रकाराचाही असल्याचे दीपक नाना देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

याच कार्यक्रमात संस्थेच्या वतीने व्यसनमुक्ती, स्वच्छता आणि परळीतील मुलभूत प्रश्नांवर लेखन व जनजागृती करणाऱ्या पत्रकार,आणि माध्यमांना विशेष प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

यामध्ये:

प्रथम क्रमांकासाठी ₹५१,००० व सन्मानचिन्ह

द्वितीय क्रमांकासाठी ₹२१,००० व सन्मानचिन्ह

तृतीय क्रमांकासाठी ₹११,००० व सन्मानचिन्ह

असे बक्षिसांचे नियोजन असल्याचे एका अधिकृत आवाहनाद्वारे दीपक नाना देशमुख यांनी जाहीर केले.

“माध्यमांनी समाजात फक्त बातम्या दाखवू नयेत, तर दिशा दाखवावी, आणि व्यसनमुक्तीच्या लढ्यात हेच पत्रकार आमचे खरे सामाजिक सुधारणेसाठी करत असलेले कार्य हे प्रभावी ठरत आहे,” असे उद्गार देखील त्यांनी यावेळी काढले.

हा उपक्रम परळीच्या सामाजिक जाणीवेचे प्रतीक ठरून इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या