स्विफ्ट डिझायरमधून सुरू होती ‘दारू विक्री’;
परळीत स्थानिक गुन्हे शाखेची सर्जिकल स्ट्राईक,
४.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त
परळी (प्रतिनिधी) –
अवैध दारू वाहतुकीचा सुळसुळाट रोखण्यासाठी परळी ग्रामीण पोलिसांनी आज एक ठोस पाऊल उचलले. मरळवाडी रस्त्यावर पेट्रोलिंगदरम्यान स्विफ्ट डिझायर कारमधून दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी धडक कारवाई केली आणि ४,२१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
➡️ या कारवाईत खालील तिघांना अटक करण्यात आली:
1. संतोष दगडूबा मस्के
2. सय्यद रहेमान सय्यद नोमन
3. बाळासाहेब योगीराज यादव
(सर्व रा. परळी)
देशी-विदेशी दारू व फोर व्हीलर कार मिळून एकूण ₹४,२१,५०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधितांविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सुशांत सुतळे यांच्या पो.ह. रामचंद्र केकान, पो.ना. गोविंद भताने व पो.कॉ. सचिन आंधळे यांनी केली.
स्विफ्ट डिझायरमधून सुरू होती ‘दारू विक्री’;
परळीत स्थानिक गुन्हे शाखेची सर्जिकल स्ट्राईक, ४.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त