-5.4 C
New York
Friday, January 16, 2026

Buy now

स्कुटीवर सापडलेल्या ४ पुड्यांवरून उलगडला गुटख्याचा मोठा साठा

स्कुटीवर सापडलेल्या ४ पुड्यांवरून उलगडला गुटख्याचा मोठा साठा

परळी पोलिसांची ३.८५ लाखांची मोठी कारवाई

 

परळी (प्रतिनिधी)

परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका अल्पवयीन स्कुटीस्वाराच्या झडतीतून गुटख्याच्या अवैध साखळीचा पर्दाफाश केला आहे. अवघ्या चार पुड्यांवरून सुरुवात झालेली तपासाची साखळी थेट ३ लाख ७० हजार रुपयांच्या प्रतिबंधित गुटखा साठ्यापर्यंत पोहोचली.

दि. २३ जून रोजी पोउपनि ए.टी. शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असताना, संभाजी चौकाजवळ एका अल्पवयीन स्कुटीस्वारावर संशय आल्याने त्याची झडती घेतली असता स्कुटीवरून प्रतिबंधित गुटख्याचे चार पुडे सापडले. अधिक चौकशीत त्याने गुटखा दादाहरी वडगाव येथील उद्धव गोलेर यांच्या किराणा दुकानातून घेतल्याचे कबूल केले.

यानंतर पोलिसांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देऊन, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित दुकानावर छापा टाकला असता, तेथून ३.७० लाख रुपयांचा मोठा गुटखा साठा व १५ हजार रुपये किमतीची होंडा अ‍ॅक्टीव्हा स्कुटी (MH-44-Y-8424) असा एकूण ३,८५,३७८/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी अनुराधा ज्ञानदेव भोसले यांनी पंचनामा करून फिर्याद दिली असून, उद्धव पंढरीनाथ गोलेर व एका अल्पवयीन व्यक्तीविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भा.पो.से.), पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे,
यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि ए.टी. शिंदे, पो.ह. नागरगोजे, पो.ह. पठाण, पो.का. चव्हाण, पो.का. ठोंबरे, पो.का. येरडलवार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या