गुरु म्हणजे व्यक्तीमधील अज्ञान आणि अंधकार दूर करतो
प्रतिनिधी- सोपान पगारे
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील संगीत अलंकार संजय तुपे, यांनी आत्तापर्यंत, संगीत क्षेत्रात तबला वादन व गायन, या विषयात हजारो विद्यार्थी घडवले आहेत, आणि ते विद्यार्थी चांगले नावारूपाला लावले आहेत, या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून, एक अनोखी गुरुपौर्णिमा साजरी केली, यावेळी सर्वच विद्यार्थी उपस्थित होते,
विद्यार्थी जे काही आपल्या विद्यार्थी जीवनात शिकतो किंवा आत्मसात करतो, ते त्याचा गुरु किती शिक्षित किंवा धैर्यवान आहे यावर अवलंबून असते. भारतात साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा सण म्हणजे गुरु पौर्णिमा. जैन, हिंदूंबरोबरच बौद्धांसाठीही हा सण आहे. गुरुपौर्णिमा हा मुळात एक मार्ग आहे ज्याद्वारे विद्यार्थी हा त्यांच्या गुरू किंवा शिक्षकांप्रती आपले प्रेम आणि कृतज्ञता दाखवीत असतात.
हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढच्या पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा इंग्रजी कॅलेंडरनुसार जुलै महिन्यात साजरा केला जातो. भारतीय शास्त्रानुसार, गुरु हा शब्द “गु” आणि “रु” या दोन संस्कृत शब्दांपासून बनला आहे, ज्यातील पहिल्याचा अर्थ व्यक्तीमधील अज्ञान आणि अंधार आहे आणि नंतरचा अर्थ असा आहे की जो तो अंधार दूर करतो.
तर गुरु या शब्दाचा अर्थ असा आहे की जो कोणाचा तरी अंधार आणि अज्ञान दूर करतो. हिंदू शास्त्रानुसार गुरु पौर्णिमा हा सण गुरु व्यासांच्या जन्मानिमित्त साजरा केला जातो. गुरु व्यास हे ४ वेद, १८ पुराणे आणि महाभारताचे रचगुरुपौर्णिमा साजरी करणे ही अशी गोष्ट आहे.
चौकट
यावेळी बोलताना तुपे सरांनी सांगितले
सर्वांनी गुरुपौर्णिमेच्या मला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञान हाच एकमेव मार्ग आहे ज्ञान जीवनातला अंधार दूर करतो कुठल्याही समस्येचे मूळ हे अज्ञानात दडलेलं असतं म्हणून जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञान मिळवत रहा,