20.3 C
New York
Monday, June 1, 2026

Buy now

परळी ते घाटनांदूर रेल्वे ट्रॅकवर अज्ञात पुरुषाचा मृतदेह

परळी ते घाटनांदूर रेल्वे ट्रॅकवर अज्ञात पुरुषाचा मृतदेह

ओळख पटवण्याचे परळी ग्रामीण पोलिसांचे आवाहन


​परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

परळी ते घाटनांदूर रेल्वे ट्रॅकवर लेंडेवाडी (ता. परळी वैजनाथ) शिवारात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, नागरिकांनी ओळख पटवण्यास मदत करावी, असे आवाहन परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लेंडेवाडी शिवारातील रेल्वे ट्रॅकवर एका पुरुषाचा मृतदेह पडलेला असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याची माहिती परळी ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

➡️ ​मृताचे वर्णन खालीलप्रमाणे आहे

​वय: अंदाजे ३५ ते ४० वर्षे
​पोशाख: अंगात चॉकलेटी आणि पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचा चेक्स शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट.
​इतर वस्तू: आकाशी रंगाची डिक्सी स्कॉट (Dixcy Scott) कंपनीची अंडरवेअर, खिशात लाल चेक्स असलेला रुमाल.

​पायात लेस नसलेले (विदाऊट लेस) हिरव्या-पांढऱ्या रंगाचे बूट.

➡️ ​पोलिसांचे आवाहन –

या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती असल्यास, किंवा हा कोणाचा नातेवाईक अथवा ओळखीचा असल्यास त्यांनी तातडीने परळी ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
​संपर्क अधिकारी:
१) पोलीस निरीक्षक एम. ए. सय्यद – मो. क्र. 8793931595
२) सपोनि सदानंद मेंडके – मो. क्र. 7447554607

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या