16.3 C
New York
Wednesday, October 15, 2025

Buy now

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंनी केले अभिवादन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंनी केले अभिवादन

परळी वैद्यनाथ (दि. 01) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त परळी वैद्यनाथ शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार व कार्य आम्हाला कायम प्रेरणा देत राहतील, असे यानिमित्ताने धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी वैद्यनाथ स.कारखान्याचे संचालक अजय मुंडे, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहाराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, के डी उपाडे, पी जी मस्के, हनुमंत गायकवाड, रमेश मस्के, जितेंद्र मस्के, वसंतराव उदार, नानाभाई पठाण, नाजीर हुसेन, सोफीया नंबरदार, शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव शिंदे, वैजनाथराव माने शिंदे, लहुजी क्रांती सेनेचे भागवत वाघमारे, निलेश सगट आदी उपस्थित होते.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या