12.5 C
New York
Monday, March 17, 2025

Buy now

शिवसेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सामाजिक उपक्रमातून साजरी

शिवसेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सामाजिक उपक्रमातून साजरी

परळी,( प्रतिनिधी):- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या चौकात प्रतिमेस अभिवादन व पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.तसेच,परळी शहरात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,वृक्षारोपण अश्या सामाजिक उपक्रमातून जयंती साजरी करण्यात आली.

शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक,युवासेना कोअर कमिटीचे सदस्य अविनाश खापे पाटील,युवासेना जिल्हाप्रमुख सुमित भैया कोळपे,यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना परळी.वै च्या वतीने विविध सामाजिक,लोकोपयोगी असे कार्यक्रम राबवून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव गावात झाला. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर असलेल्या अण्णाभाऊनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य,लोकनाट्य,कादंबऱ्या,चित्रपट,पोवाडे,लावण्या,गवळण,प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले अश्या महापुरुषांमुळे लोककला हि जिवंत राहिली आहे त्यामुळे अश्या महापुरुषांची जयंती सामाजिक उपक्रमातूनच साजरी करावी असे प्रतिपादन युवासेना उपजिल्हाप्रमुख बालासाहेब देशमुख व युवासेना शहरप्रमुख गजानन कोकीळ यांनी केले,तसेच शिवसेनेने या कार्यक्रमातून एक सामाजिक सलोखा जपला आहे.

याप्रसंगी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शिवाजी जिजा शिंदे,उपजिल्हाप्रमुख रामराव माने,महिला आघाडी तालुकाप्रमुख यशोदा राठोड,युवतीसेना तालुकाप्रमुख अनिता चव्हाण,युवतीसेना शहरप्रमुख ज्योती पवार,तालुका सचिव विश्वनाथ राठोड,तालुकसंघटक अंकुश राठोड,उपतालुकाप्रमुख सुंदर रवळे,सिरसाळा शहर प्रमुख कैलास कावरे,युवासेना उपजिल्हाप्रमुख बालासाहेब देशमुख,युवासेना तालुकाप्रमुख सोमेश्वर गित्ते,युवासेना शहरप्रमुख गजानन कोकीळ,युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन चव्हाण,युवासेना उपतालुकाप्रमुख आशुतोष शिंदे,तालुकसंघटक शिवराज गित्ते,युवासेना शहरसचिव शैलेश कदम,युवासेना शहरसमनव्यक सतीश कदम(गावडे),युवासेना उपशहरप्रमुख सागर बुंदुले,युवासेना शहरसंघटक नवनाथ लोभे,आदिसह असंख्य पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या