8.2 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांचेकडून निवडणूक कामकाजांचा आढावा

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- 2024

*मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांचेकडून निवडणूक कामकाजांचा आढावा*

कारंजा येथे आढावा सभा

वाशिम,दि.21 (अजय ढवळे ) भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- 2024 जाहिर केला आहे.मतदार यादीच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.आज 21 डिसेंबर रोजी डॉ.श्रीमती पाण्डेय यांनी कारंजा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे भेट देवून जिल्हयातील निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी तथा कारंजा तहसिलदार डॉ.अपुर्वा बासूर,उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे, कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत व नायब तहसिलदार श्री. बनसोडे यांची यावेळी उपस्थिती होती.

डॉ.श्रीमती पाण्डेय यांनी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत आढावा घेतला.यामध्ये नविन मतदार अर्ज स्विकृती तसेच मतदार यादीतून अपात्र मतदार वगळणे,मतदार यादीमध्ये महिला व तरुण मतदारांची संख्या वाढविणे,दिव्यांग मतदारांच्या नावापुढे नोंदणी करणे,स्विप मतदार जनजागृती व इव्हीएम मतदार जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे आदी उपक्रमांचा या सभेत आढावा घेतला.जिल्हयात जिल्हाधिकारी,उपजिल्हा निवडणूक अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मतदार जनजागृती आणि इव्हीएम जनजागृतीचे काम प्रभावीपणे करण्यात येत असल्याबाबत डॉ.श्रीमती पाण्डेय यांनी समाधान व्यक्त केले.
*******

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या