14.5 C
New York
Thursday, May 30, 2024

Buy now

spot_img

श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट व वीरशैव समाज परळीच्या वतीने महास्वामीजींचे स्वागत. 

श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट व वीरशैव समाज परळीच्या वतीने महास्वामीजींचे स्वागत.

परळी वैजनाथ | अमोल सूर्यवंशी

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे गुरूवारी श्री हिमवत केदार वैराग्य सिंहासनाधिश्वर केदारनाथ रावल श्री श्री श्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी ओखी मठ ,उत्तराखंड यांनी  दर्शन घेतले. यावेळी महास्वामीजींनी श्री वैद्यनाथ प्रभूस पूजा व आरती केली.श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सेक्रेटरी प्रा.बाबासाहेब देशमुख यांनी तर वीरशैव समाज परळीच्या वतीने श्री केदारपीठ महास्वामीजींचे स्वागत करून अनेकांनी  आशीर्वाद घेतले.

यावेळी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अनिल तांदळे,रघुवीर देशमुख  उपस्थित होते. महास्वामीजी यांचे परळी शहरातील श्री मल्लिकार्जुन बेंडसुरे, रामलिंग बेंडसूरे व घेवारे आप्पा यांच्या निवासस्थानी  स्वागत करून आशीर्वाद घेतले तसेच वैद्यनाथ मंदिरात अनेक भाविकांनी महास्वामीजींचे दर्शन घेतले

यावेळी परळीतील दर्जेदार दिवाळी अंक परळी दर्शन अंकाचे विमोचन महास्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव बाबासाहेब देशमुख सर, विश्वस्त अनिलराव तांदळे, अशोक स्वामी,मठपती गणेश स्वामी , सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर, राजेंद्र ओझा,  कमलाकरआप्पा हरेगावकर, महादेवअप्पा ईटके, मनोज एस्के, संतोष चौधरी, अॅड.मनोज संकाये, मंगलनाथ बँकेचे व्यवस्थापक गजानन हालगे, पत्रकार संजय खाकरे, संतोष जुजगर,  रमेश चौंडे, सुशील हरंगुळे, उमेश टाले, विनोद बांगर, शिरीष स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या