तळेगाव घाट येथील श्रुतिका यादव या विद्यार्थिनीस ॲड.माधव जाधव यांनी दिला मदतीचा आधार…
अंबाजोगाई:परळी विधानसभा मतदारसंघातील तळेगाव घाट ता.अंबाजोगाई जिल्हा बीड येथील श्रुतिका जगदीशराव यादव ही विद्यार्थिनी सध्या लातूर येथे नीट या परीक्षेची तयारी करत आहे.श्रुतिका यादव या मुलीचे आई वडील मोल मजुरी करून मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुलीच्या शिक्षणामध्ये अडचण येत आहे व श्रुतिका यादव हे तिचे स्वप्न पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहे ही बाब ॲड माधव जाधव यांना समजल्यानंतर ॲड माधव जाधव यांनी श्रुतिका यादव हिच्या पुढील शिक्षणासाठी दहा हजार रुपये (10000/-) रोख आर्थिक मदत करून तिला आधार दिला. तसेच या पुढील शिक्षणासाठी लागेल ती मदत करण्याची हमी ॲड माधव जाधव यांनी दिली.यावेळी योग गुरु इंजिनियर परमेश्वर भिसे सर व तसेच श्रुतिका यादवचे वडील जगदीशराव यादव ऊपस्थीत होते.
तळेगाव घाट येथील श्रुतिका यादव या विद्यार्थिनीस ॲड.माधव जाधव यांनी दिला मदतीचा आधार…
https://atulyamaharashtra.com/









