19 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

अबब..!मुबंई मार्केट कमिटीत नोकरीं लावतो म्हणून 5लाख घेतले नोकरीं तर नाही ;पैसे परत दिले नाही

अबब..!मुबंई मार्केट कमिटीत नोकरीं लावतो म्हणून 5लाख घेतले
नोकरीं तर नाही ;पैसे परत दिले नाही

माजलगाव : प्रतिनिधी
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे 2017 ते 2019 या वर्षात कंत्राटी करणाऱ्या एका चालकाकडून निमशासकीय असलेल्या मुबंई मार्केट कमिटी मध्ये कायमस्वरूपी चालक म्हणून नोकरीं ला लावतो म्हणून माजलगाव शहरातील एका निबरडक पुढऱ्याने थोडी थोडकी नाही तर तब्ब्ल 5लाख रु ची रक्कम पाच वर्षांपूर्वी घेतली असल्याची आपबीती सदरील चालकाने शोक व्यक्त करत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितली. वेदनादायक गोष्ट म्हणजे नोकरीं लावली नाही त्याने कर्जने काढलेले 5लाख परत दिले नाही वरून माजलगाव च्या कंत्राटी नोकरीवर ही कायमस्वरूपी केले नसल्याने ती नोकरीं सोडली असल्याचे त्याने सांगितले.
माजलगाव शहराच्या जवळील मोठी ग्रामपंचायत असलेल्या गावातील या तरुणाला भावी आमदार म्हणवून घेणाऱ्या या मोठ्या (?)पुढऱ्याने 5लाख रु चा कडक चुना लावला आहे.विशेष म्हणजे निमशासकीय असलेल्या व चतुर्थ श्रेणी वर्गातील नोकरीला पाच लाख रु उकळले व नोकरीला ही लावले नसल्याचे कळल्यावर किती ही पाषाणह्रदयी माणूस हेलावल्या शिवाय राहणार नाही. शासकीय व निमशासकीय नोकरीतील फरक न कळल्यामुळे हा युवक फसला. मार्केट कमिटीच्या नोकरीला तो सरकारी नोकरी समजून फसला.2017 ते 2019 दरम्यान माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा युवक पहारेकरी म्हणून कामाला होता. दरम्यान च्या काळात गाडीवर चालक म्हणून अनेक वेळा या पुढऱ्याच्या गाडीवर त्याला जबरदस्तीने पाठवले गेले. या युवकांच्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घेत या पुढऱ्याने मुबंई मार्केट कमिटी मध्ये आपली ओळख आहे चालक म्हणून नोकरीं लावण्याचे आश्वासन या युवकला दिले. आपल्याला पैसे लागत नाही पण आपला राज्यपातळीवरील भावी मुख्यमंत्र्याला 10 लाख द्यावे लागतील असे सांगून हॊ नाही करत 5लाख रु मध्ये नोकरीं द्यायचे ठरले. पण महिन्या मागून महिने उलटले तरी नोकरीं नाही आणि पैसे ही परत मिळाले नाही.सदरील रकमेचे व्याज पाहता पाच वर्षात ही रक्कम 8लाख रु च्या घरात जाते.शिवाय माजलगाव कृऊबा ची नोकरीही कायमस्वरूपी होत नसल्याचे पाहून या युवकांने नाद सोडून दिला. अशा बदमाश पुढऱ्यामुळे युवकांवर आत्महत्या करण्याची वेळ येत असून यावर पक्ष नेतृत्वाने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

चौकट
पक्ष नेतृत्वाच्या नावाखाली पैसे उकळण्याचा फ़ंडा
मागील अनेक वर्षांपासून पक्ष नेतृत्वाला पैसे द्यावे लागतात असे सांगून पद देण्यासाठी, तिकीट देण्यासाठी, टेंडर मिळवून देण्यासाठी, नोकरीं लावण्यासाठी गोरगरिबाकडून लाखो रु उकळणाऱ्या दलाल पुढऱ्याचा बंदोबस्त पक्ष नेतृत्वाने करावा अशी सामान्य माणसा कडून मागणी होत आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या