ज्वारी पिकाला योग्य मोबदला मिळणार:
पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे
बीड, दि, 12 (जि. मा. का.) :
ज्वारी पिकाला योग्य मोबदला मिळणार अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे सांगितली आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत पणन हंगाम 2023-2024 (रब्बी) मध्ये ज्वारी खरेदी करण्याकरिता केंद्र शासनाकडून दि. 31 ऑगस्ट 2024 अखेर मुदत देण्यात आली होती. परंतू राज्यातील नोंदणीकृत शेतक-यांची ज्वारी खरेदी पूर्ण न झाल्याने ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी या शेतक-यांच्या मागणी नुसार पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहीत निकम व सर्व सन्मानीय संचालक मंडळाने सदर प्रकरणी अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे वारंवार विनंती केल्याप्रमाणे अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री महाराष्ट राज्य यांनी केंद्र शासनाकडे व्यक्तीश: पाठपुरावा करुन महाराष्ट्रातील शेतक-यांना ज्वारी खरेदीसाठी दि. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत वाढ मिळवून दिली आहे. त्यामुळे शेतक-यांना हमी भाव योजनेचा लाभ होणार असून शेतक-यांना त्यांच्या ज्वारी पिकाचा योग्य मोबदला मिळून आर्थिक फायदा होणार आहे, अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांनी दिली.