20.9 C
New York
Tuesday, October 8, 2024

Buy now

न्यूज लोकमन राज्यस्तरीय फिल्मी गीत स्पर्धेत लातूरची प्रियांका बनसोडे राज्यात प्रथम

न्यूज लोकमन राज्यस्तरीय फिल्मी गीत स्पर्धेत लातूरची प्रियांका बनसोडे राज्यात प्रथम

न्यूज लोकमन च्या वर्धापन दिनाची सांगता डॉ .राजेश इंगोले व एन. डी. शिंदे यांच्या उपस्थितीत !

आंबेजोगाई (प्रतिनिधी)

न्यूज लोकमच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आंबेजोगाई राज्यस्तरीय फिल्मी गीत व काव्य वाचन स्पर्धेचे अनोख आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातून जवळजवळ दोनशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवून या आंबेजोगाईतील ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेतला.
या सोहळ्याची सांगता सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेश इंगोले व एन डी शिंदे भावी आमदार व दैनिक शिवजागर चे संपादक शंकर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले व राज्यातील आलेल्या विजयी स्पर्धकांना त्यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

न्यूज लोकमन ला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून बीड येथील पत्रकार बांधवांची उपस्थिती,,,!

न्यूज लोकमनला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी व राज्यस्तरीय स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी डिजिटल मीडियाचे राज्याचे कार्याध्यक्ष अनिलजी वाघमारे दैनिक वास्तव चे सर्वेसर्वा व डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाट लोकनायक ची संपादक व्यवस्थापक डिजिटल मीडियाचे उपाध्यक्ष विश्वंभर जी मुळे साहेब महाराष्ट्रातील एकमेव निर्भीड व्यक्तिमत्व मराठी महाराष्ट्राचे संपादक संग्रामजी धनवे व इतर पत्रकार संपादकांनी न्यूज लोकमन च्या राज्यस्तरीय स्पर्धेला वर्धापन दिनाला आवर्जून उपस्थिती लावून न्यूज लोकमन चे संपादक संजय जोगदंड यांना भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी संजय जोगदंड हे भाऊक झाले होते.

यात काव्य वाचन स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावत विजय खेचला त्यानंतर द्वितीय पारितोषिक भारतीय जीवन भारती जीवन प्रभू खोत तर तृतीय पारितोषिक अंकुश गडदे आणि उत्तेजनार्थ बीडच्या संध्या जाधव यांनी पटकावले या राज्यस्तरीय स्पर्धेच्या पारदर्शक परीक्षणाचे काम सुप्रसिद्ध कवी प्रा. डॉ. राजपंखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.गोरक्षेंद्रे प्रा.रमेश मोठे डॉ. दिलीप भिसे यांनी पाहिले राज्यस्तरीय फिल्मी गीत गायन स्पर्धेत
यात मोठ्या गटात राज्यातून लातूरची प्रियंका बनसोडे प्रथम तर परभणीच्या शुभम मस्के यांनी दुसरा क्रमांक पटकावत आंबेजोगाई चे सुप्रसिद्ध गायक बळीराम उपाडे यांनी तिसरा क्रमांक पटकावला उत्तेजनार्थ गणेश शर्मा तर छोट्या गटात अपूर्वा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला परळी वैजनाथ येथील प्रतीक्षा कस्तुरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावत महिमा काळे व देविका यादव यांनी राज्यातून विभागून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर उत्तेजनार्थ छोट्या गटात प्राची मुसळे हिला मिळाला आहे या फिल्मी गीताचे पारदर्शक परीक्षण स्वर सम्राट प्रा. शंकर जी शिंगारे स्वरसाधक प्रा. ऋचा कुलकर्णी व संगीत तज्ञ शैलेश पुराणिक यांनी पाहिले. यावेळी राज्यातून आलेले सर्वच कलाकार भारावून गेले होते
या कार्यक्रमाला खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्याप हेंडगे सर गायकवाड सर हे आवर्जून उपस्थित होते. आंबेजोगाईतील ही स्पर्धा पाहून आंबेजोगाई कर चकित झाले होते यावेळी स्पर्धकांनी एकापेक्षा एक काटे की टक्कर ची गाणी सादर करून आंबेजोगाई करांना अनोखी पर्वणी दिली. या कार्यक्रमाचे बहारदार अविस्मरणीय सूत्रसंचालन प्राध्यापक गवळी सरांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. महादेव माने नाट्यकलावंत प्रवीण जोगदंड उर्दू न्यूज संपादक आरिफ सिद्दिकी भरारी न्युज संपादक उत्तरेश्वर शिंदे संतोष आंबेकर किसान चे पत्रकार शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या