5 C
New York
Tuesday, December 3, 2024

Buy now

राजरत्न आंबेडकर यांच्यासाठी मनोज दादा जरांगे घेणार जाहीर सभा

राजरत्न आंबेडकर यांच्यासाठी मनोज दादा जरांगे घेणार जाहीर सभा

वाशीम / बातमीपत्र

    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष  राजरत्न आंबेडकर यांच्या प्रचारासाठी वाशिम विधानसभा मतदारसंघात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील जाहीर प्रचार सभा घेणार आहेत.त्यामुळे वाशिम मंगरुळपीर मतदार संघातून मराठा समाजाची मते राजरत्न आंबेडकर यांना मिळणार आहेत.

    34 वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघातून राजरत्न आंबेडकर निवडणूक लढवित आहेत.मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.ज्याला निवडून आणायचे त्याला आणा आणि ज्याला पाडायचे त्याला पाडा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

     दरम्यान मनोज दादा  जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,मराठा समाजाचा आंबेडकर यांना वाशिम मध्ये पाठिंबा राहील तसेच त्यांच्या साठी मी जाहीर सभाही घेणार आहे. तसेच  मौलाना सज्जाद साहेब नोमानी यांचाही त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे  राजरत्न आंबेडकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या