0.5 C
New York
Saturday, December 7, 2024

Buy now

पक्षाचे मतविभाजन होऊन नुकसान होऊ नये यासाठी माझी माघार – राजेभाऊ फड

पक्षाचे मतविभाजन होऊन नुकसान होऊ नये यासाठी माझी माघार – राजेभाऊ फड

आगामी काळात पक्षाचे काम निष्ठेने करण्याची भूमिका

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या मतात फूट पडून पक्षाचे नुकसान होऊ नये यासाठी मी माघार घेत असून, आगामी काळात तेवढ्याच ताकदीने पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार असल्याचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी सांगितले. सोमवारी त्यांनी आपला अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेऊन पक्षाचे काम निष्ठेने करणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली.

मी शरदचंद्र पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाला मी उमेदवारी देण्याची मागणी केली होती. लोकशाहीत मागणी करण्याचा अधिकार हा सर्वांनाच असतो. मात्र पक्षाचा विचार आणि पक्षाचे धोरण स्वीकारणे आणि त्याचे पालन करणे हे प्रत्येक कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. पक्षाच्या मतात विभाजन होऊ नये आणि नुकसान होऊ नये यासाठी मी माघार घेत असून, आगामी काळात पक्षाचे काम मी त्याच ताकदीने करणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी जाहीर केली. सर्वसामान्य जनतेसाठी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या