युवा नेते राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी वसंत हंकारे यांचे व्याख्यान तर शुक्रवारी खेळ पैठणीचा कार्यक्रम
आष्टी (प्रतिनिधी)
जामगाव चे सरपंच तथा युवा नेतृत्व राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दि.20 फेब्रुवारी रोजी मुला मुलींच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारे प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान तर शुक्रवार दि 21 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर,न्यू होम मिनिस्टर यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राधेश्याम धस मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
आष्टी तालुक्यातील जामगावचे सरपंच तथा युवा नेतृत्व राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.यंदाही दि.20 फेब्रुवारी गुरुवार रोजी सायंकाळी 7 वाजता आष्टी शहरातील पंचायत समिती प्रांगणात आई-वडील मुल-मुली यांच्या नात्यातील सुंदर व्याख्या सांगणारे व संपूर्ण कुटुंबांनी एकत्रित येऊन ऐकावे असे प्रेरणादायी प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान होणार आहे.
तर शुक्रवार दि.21 रोजी सकाळी 9 वाजता भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तसेच सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन राधेश्याम धस मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.