मनसेचे कैलास दरेकर यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन
- प्रतिनिधी :
आष्टी नगरपंचायत हद्दीत नगरपंचायती मार्फत घंटागाड्या द्वारे कचरा संकलनाचे काम गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे.कचरा संकलनासाठी असलेल्या या गाड्यांवर घोषणा गीत वाजविण्यात येत असून ते मराठी भाषेमध्ये वाजविण्यात येणे गरजेचे आहे.मराठी भाषा ही आपल्या लोकपरंपरा, लोकसंस्कृती,लोकांचाच,लोक विधी,लोकोत्की, लोक विचार, लोकभावना आदींचा वाहक आहे.मराठी भाषेमुळेच आपली अस्मिता आणि आपले जीवन समृद्ध झाले आहे.या भाषेमुळेच आपला विकास आणि समृद्धी घडत असल्याने मराठी भाषेने ही आपल्या प्राचीन व समृद्ध अशा लोकसंस्कृतीचे,लोकसाहित्याचे,लोक प्रतिभेचे,इतिहासाचे जतन व संवर्धन करून आपली अस्मिता जिवंत ठेवली आहे.मराठी भाषेचे ही ॠण कधीही न फिटणार असं आहे कायम मनात मराठीच्या ऋणातच राहून आपले जीवन समृद्ध होणार आहे आपली मराठी भाषा अभिजात बनली आहे यामुळे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी दि.२७/२/२०२५ पासून नगरपंचायत हद्दीत कचरा संकलनासाठी फिरणाऱ्या वाहनांवर मराठी भाषेतील घोषणा गीत वाजविण्यात सुरुवात करावी असं निवेदन देवून मागणी केली आहे.